Wednesday, May 1, 2024
Homeराज्यनांदेड मध्ये होळीनिमित्त होणार २४ मार्च रोजी महामूर्ख कवी संमेलन...

नांदेड मध्ये होळीनिमित्त होणार २४ मार्च रोजी महामूर्ख कवी संमेलन…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

वर्षभर ज्या कवी संमेलनाची रसिक आतुरतेने वाट पाहतात ते होळीनिमित्त सतत २२ व्या वर्षी होणारे महामुर्ख कविसंमेलन रविवार दि.२४ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत कलामंदिरची नूतन वास्तू तयार होत असल्यामुळे यावर्षी हळदी लिलाव शेड, नवा मोंढा नांदेड येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संपादक डाॅ. जुगल धुत, राजेशसिंह ठाकूर, अनुराग जाजू, ॲड. जुगलकिशोर धूत, जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांनी दिली आहे.

दरवर्षी हे कवी संमेलन कला मंदिर मधील गंधर्व नगरी येथे होते. परंतु कलामंदिरची नूतन वास्तू तयार होत असल्यामुळे यावर्षी कवी संमेलन नवा मोंढा येथील हळदी लिलाव शेडमध्ये घेण्यात येणार आहे. वाराणसी नंतर फक्त नांदेडमध्येच होळीच्या कविसंमेलनाचे आयोजन होलिका उत्सव समिती व लायन्स क्लब नांदेड सेंट्रल द्वारे करण्यात येते.

यामध्ये शृंगारिक कविता आणि द्विअर्थी विनोदाची रेलचेल असते. यादरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे यावेळी अध्यक्ष , उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून कोणत्याही राजकीय व्यक्तींना बोलवण्यात येणार नाही. कवी संमेलनाला मदत करणा-या दानशूर नागरिकांना योग्य तो सन्मान देण्यात येईल.

आगळ्यावेगळ्या या कवी संमेलनात भोपाळ मध्यप्रदेश येथील धूमकेतू, उत्तर प्रदेशचे तिरपट इलाहाबादी,अकोला येथील विनोद सोनी,लातूर येथील योगीराज माने यांना विशेष आमंत्रित करण्यात आले.

याशिवाय महामूर्ख कवी संमेलन नेहमीच गाजविणारे हास्यसम्राट सिध्दार्थ खिल्लारे व शाहीर रमेश गिरी,चला हवा येऊ दे फेम सतीश कासेवाड,प्रा.रविंद्र अंबेकर,पत्रकार राजेंद्र शर्मा,रेश्माजी हिंगोले,सिनेस्टार लच्छु देशमुख,बजरंग पारीख,वैजनाथ जाधव,राजेंद्र उपाध्याय,सुरेश बामलवा,विलास जोगदंड हे आपल्या प्रतिभेने रसिकांचा वर्षभरातील हसण्याचा कोटा पूर्ण करणार आहेत.

कार्यक्रमाचे स्थळ बदलले असल्यामुळे नवीन स्थळाची माहिती आपल्या सर्व मित्रांना देण्यात यावी. कार्यक्रम निशुल्क असला तरी १६ वर्षावरील पुरुषांनाच प्रवेश मिळणार आहे. जागा मर्यादित असल्यामुळे रसिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.


Share
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: