Monday, May 27, 2024
Homeराज्यम.न.पा. उर्दु शाळा क्र.१० बडनेरा येथे मतदान जनजागृती रॅली...SVEEP अंतर्गत आयोजन...

म.न.पा. उर्दु शाळा क्र.१० बडनेरा येथे मतदान जनजागृती रॅली…SVEEP अंतर्गत आयोजन…

अमरावती – लोकसभा सार्वञिक निवडणुक २०२४ अंतर्गत ०७— अमरावती लोकसभा मतदारसंघात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने “sveep उपक्रम” अंतर्गत  मनपा उर्दु शाळा क्र १० बडनेरा येथे “चुनावी पाठशाला” चे आयोजन करण्यात आले. या मध्ये विद्यार्थ्यानी मतदान जनजागृती पथनाट्य सादर केले.

त्या पथनाट्यमध्ये मतदानाचे महत्व पटवुन दिले. तसेच  शाळेतील प्रत्येक विद्यार्थी यांना संकल्प पत्र पालकांकडून भरून घेण्यात आले, सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मतदाणाची शपथ घेतली. या उपक्रमास पालकाचा व नव मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटला.यानंतर चुनावी पाठशालाचे आयोजन करण्यात आले.

त्यामध्ये संपुर्ण मतदान प्रकीया कशी होते त्याचे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यानी उपस्थित पालक व नागरीकांना करुन दाखविले.याव्दारे मतदान जनजागृती केली. चुनावी पाठशाला उपक्रमाला डाॅ.श्री. प्रकाश मेश्राम,मनपा शिक्षणाधिकारी तथा सहा .कार्यक्रम अधिकारी स्वीप प्लॅन  अमरावती यांची प्रमुख उपास्थिती होती.

यावेळी मुख्याध्यापक मोहम्रद ईम्रान अबु नबी, व स्वीप विभागातील सदस्य श्री कैलास कुलट,  श्री उज्वल जाधव, श्री सुमेश वानखडे तसेच शाळेचे सर्व शिक्षक जमील अहमद,मै. अकबर,शेख यासिन अजहर उललाह,नियाजोद्दीन मो. जुनेदशोएब फैसल तोसिफ उल्हकक,निकहत प्रविण समिना बिनो,शबिना नाज गुलनाज परविण तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments