Thursday, April 25, 2024
Homeगुन्हेगारीमहाराष्ट्र व तेलंगणाच्या सिमेवरील येसगी येथील जुगार अड्डयावर लाखोंची उलाढाल...बिलोली शहरातील मटकाचालक...

महाराष्ट्र व तेलंगणाच्या सिमेवरील येसगी येथील जुगार अड्डयावर लाखोंची उलाढाल…बिलोली शहरातील मटकाचालक हि मालामाल…

Share

महेंद्र गायकवाड
नांदेड
बिलोली तालुक्यात अवैध जुगार व मटका खुलेआम चालू असून महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर येसगी येथे चालू असलेल्या जुगार अड्डयावर दररोज लाखोंची उलाढाल होत असून बिलोली शहरातील मध्यवस्तीत आपल्या घरात खुलेआम मटका व जुगार अड्डा चालवीणारा व्यक्ती हि मालामाल झालाआहे.

येसगी,बिलोली येथील अवैध धंदे चालकांसोबत विविध पक्षाचे चेलेचपाटे असल्याने आमचे कांही वाकडे होणार नाही अश्या तोऱ्यात हे अवैधधंदे चालक वावरात आहेत त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपविभागीय अधीकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेने शहर व परिसरातील मटका, अवैध जुगार चालकावर कारवाई करावी.आणि आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी घडवून आणावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यातून होत आहे.

बिलोली शहरात व परिसरात कलम 144 लागू असताना व आदर्श आचारसंहिता चालू असताना बिलोली शहरातील मध्यवस्तीत एका घरात, व कांही लोकांच्या शेतात, घरात खुलेआम मटका व जुगार चालू आहे. तसेच येसगी या भागात एक मोठा अवैध जुगार अड्डा चालू आहे.जुगार, मटक्यातून लाखोंची उलाढाल होत असून लाखोंची कमाई होत असल्याने आम्ही सर्वाना पैसे देऊन हा धंदा करीत आहोत. कितीही बातम्या आले तरी आमचे कांही वाकडे होत नाही असे या मटका व जुगार अड्डा चालकांकडून ऐकावयास मिळत आहे.महाराष्ट्र व तेलंगणाच्या सीमेवर चालू असलेल्या या जुगार अड्डयावर आंतरराज्यातील व्यक्ती मोठया प्रमाणात जुगार खेळण्यासाठी येत असल्याने ऐन निवडणुकीच्या काळात या जुगार अड्डयात वादविवाद व कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर बिलोली शहरात हि जागोजागी मटक्याच्या बुकी चालू असून मटका चालकाच्या घरात अनेकजन जुगार खेळत आहेत.एकीकडे जिल्हा प्रशासन आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सर्वाना आवाहन करीत आहे.

तर दुसरीकडे या अवैधधंद्यामुळे कलम 144 लागू असताना या आदर्श आचार संहितेचा फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.या अवैध धंद्यामुळे तालुक्यात व बिलोली शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळेवरच प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.


Share
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: