Friday, May 3, 2024
Homeराज्यपत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारास मारहाण...अमरावती शहरातील धक्कादायक घटना...एका आरोपीस अटक

पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला पत्रकारास मारहाण…अमरावती शहरातील धक्कादायक घटना…एका आरोपीस अटक

Share

पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला अमरावती शहरातील जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयात वृत्त संकलन करण्याकरिता गेलेल्या एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अमर घटारे यांना तेथील वराहच्या मालकाने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेचा अमरावती शहरासह जिल्ह्यातील संपूर्ण पत्रकारांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशावरून संबंधित एका आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई गाडगे नगर पोलिसांनी केली असून आरोपीवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर या प्रकरणी अमरावतीत पत्रकार संघाचे वतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे,पत्रकार अमर घटारे हे जिल्हा स्त्री रुग्णालयात गेले होते.

येथील अस्वच्छतेचा जो पहाड तयार झालेला आहे त्याबाबत व अन्य काही वृत्त संकलन करण्याकरिता ते गेले होते. दरम्यान येथील परिसरात मोठ्या प्रमाणात वराह आहेत. या वराहांचा वावर चक्क रुग्णालयात सुद्धा होतो. मात्र, त्याकडे येथील साफसफाई कामगार व रुग्णालय प्रशासन काहीच लक्ष देत नाहीत.

त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात रोगराई सुद्धा पसरली आहे. याचेच वृत्त संकलन करण्याकरिता अमर घटारे गेले असता येथील वराहाच्या मालकांनी त्यांना अडविले इतकेच नव्हे तर त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून ५ ते ६ युवकांनी त्यांना मारहाण केली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: