Thursday, April 25, 2024
Homeराज्यसर्वसामान्याच्या न्याय व हक्का करीता पत्रकारीता करणे काळाची गरज - शंकरराव नाभरे...

सर्वसामान्याच्या न्याय व हक्का करीता पत्रकारीता करणे काळाची गरज – शंकरराव नाभरे…

Share

मराठी पत्रकारा संघाच्या तालुका अध्यक्षपदी सतीश सरोदे…

पातूर – निशांत गवई

आज पत्रकारातीचे स्वरुप बदलले आहे आज सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जगात कोठेही संपर्क साधता येत असल्याने आजच्या पत्रकारीतेचे स्वरुप बदले आहे या पत्रकारीतेत सोशल मिडीयाचा वापर जास्त होते व काळाची गरज आहे.

परंतू ग्रामाण भागातील पत्रकाराना आपली पत्रकारीता करताना अनेक समस्याचा सामाना करावा लागतो पत्रकार हा समाजाचा आरसा व लोकशाहीचा चवथा आधारस्तभ म्हणुन पत्रकारीता कडे पाहील्या जात असल्याने युवकानी पत्रकारीता करताना सर्व सामान्याच्या न्याया करीता व हक्का करीता आपल्या पत्रकारीतेचा उपयोग करण्याची गरज असल्याचे मत जेष्ठ पत्रकार शंकरराव नाभरे यांनी व्यक्त केले ते पातूर येथे मराठी पत्रकार संघाच्या पातूर तालुका कार्यकारणी सदस्याची आयोजीत मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी मराठी पत्रकार संघाच्या पातूर तालुका अध्यक्षपदी सतिश सरोदे याची एकमताने अविरोध निवड करण्यात आली.

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई सग्गनित अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघ चे पातूर तालुका कार्यकारणीचे बैठकीचे आयोजन समाधानच शेत पातूर येथे अखील भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, मराठी पत्रकार परिषदेचे अकोला जिल्हाध्यक्ष शौकतअली मीर साहेब सहचिटणीस प्रमोद लाजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अयोजीत करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव नाभरे हे होते तर प्रदिप काळपांडे, (जिल्हा कार्यकारणी सदस्य )उमेश देशमुख, (जिल्हा कार्यकारणी सदस्य )अ. कद्दुसशेख (माजी तालुका अध्यक्ष )आदि मान्यवर उपस्थीत होते.यावेळी पातूर तालुका नवनिर्वाचित कार्यकारणी गठीत करण्यात आली या मध्ये तालुका अध्यक्ष पदी सतिश सरोदे उपाध्यक्ष पदी किरणकुमार निमंकडे, अ. जफर सरचिटणीस पदी संगीता इंगळे,सह सरचिटणीस पदी सै साजीद याची एकमतनाने अविरोध निवड करण्यात आली.

यावेळी मावळे अध्यक्ष अ. कद्दुश शेख, यांच्यासह प्रदिप काळपांडे, उमेश देशमुख याची समोविचीत भाषणे झाली या कार्यक्रमाला अ. जफर, मो. इम्रान, नासिर शेख, गोपाल राठोड, श्रीकृष्ण लखाडे,राहुल देशमुख, सुमित भालतिलक, श्रीकृष्ण शेगोकार, सचिन ढोणे, भावेश गिरोलकर, सै. साजीद, प्रमोद कढोणे, निखील इंगळे, किरण निमकंडे, मोहन जोशी, सतिश सरोदे, उमेश देशमुख, शंकरराव नाभरे, अ. कद्दुस शे आदि पत्रकार उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगिता इंगळे यानी तर आभार प्रदर्शन गोपाल राठोड यांनी केले.

मनोहर जोशी अंजनाबाई लाजुरकर मुकुंद देऊळगावकर यांना श्रध्दाजंली अकोला मराठी पत्रकार संघ पातूर तालुका ची कार्यकारणी बैठक रविवारी पातूर येथे पार पडली या कार्यक्रमात राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी अकोला जिल्हा कार्यकारणीचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर यांच्या आई अंजनाबाई तथा पातूर येथील माजी पत्रकार मुकुंद देऊळगावकर याचे काही दिवशा आगोदर निधन झाले त्याना यावेळी श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

मी पत्रकार संघटनेच्या मजबुती करिता तसेच ग्रामीण भंगातील सभासद वाढीसाठी आणि पत्रकाराच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना ग्रामीण पत्रकारा पर्यंत पोहचविन्या साठी कार्य करील..पत्रकारांना न्यान देण्याचा माझा प्रयत्न राहील….. सतीश सरोदे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: