Friday, May 17, 2024
HomeBreaking Newsजालना | शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांचा भीषण लाठीचार्ज...

जालना | शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांचा भीषण लाठीचार्ज…

Share

जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटे गावात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी भीषण लाठीचार्ज केला आहे. मराठा आंदोलकांचं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. आंदोलकांनी ज्या ठिकाणी मंडप उभारला होता त्यात अचानक पोलीस घुसले आणि पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज सुरु केला. यावेळी आंदोलक आपला जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले होते. तर आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

२९ ऑगस्टपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील या कार्यकर्त्याने काही सहकाऱ्यांसह उपोषण सुरु केलं होतं. आंदोलन सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्यांनी उपोषण मागे घेतलं नाही. त्यानंतर आज पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला. लहान मुलं, महिला कुणालाही पाहिलं नाही. प्रचंड लाठीचार्ज केल्यानंतर आम्ही शांत का बसायचं असं मराठा आंदोलकांनी म्हटलं आहे. एवढंच नाही पोलिसांनी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलं आहे?
आम्ही शांततेत आंदोलन सुरु केलं होतं. आम्ही शांतपणेच उपोषण आंदोलन करत होतो. काल आमचं शिंदेसाहेबांचं (मुख्यमंत्री) आणि आमचंही बोलणं झालं. आज अचानक खाडे म्हणून कुणीतरी आले. मला म्हणाले की तुम्ही उपचार घ्या. त्यानंतर मी हो म्हटलं. मात्र पोलिसांनी बहुदा आंदोलन मोडायचं ठरवलं आहे. पण माझं मराठा आंदोलकांना आवाहन आहे की जाळपोळ करु नका, तोडफोड करु नका. जे काही झालं ते ब्रिटिशांच्या काळातही घडलं नव्हतं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सगळ्या बांधवांनी शांत रहावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: