Tuesday, April 30, 2024
Homeराज्यजाज्वल देशभक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिप्रेत...

जाज्वल देशभक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिप्रेत…

Share

  • अमित बांबल यांचे मार्गदर्शन
  • नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त व्याख्यान
  • जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल चा उपक्रम

नरखेड – तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुगा..या उद्घोषातून तरुणांच्या मनात देशभक्तीचे बीजे रोखण्याचे महान कार्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले.आझाद हिंद सेनेची निर्मिती करून तरुणांची फौज तयार केली व स्वातंत्र्यसंग्रामात रणभूमीवर उतरले असे प्रतिपादन अमित बांबल यांनी जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, मार्गदर्शक म्हणून अमित बांबल तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रसमन्वयक एकनाथ खजुरीया,केंद्रसमन्वयक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात संतोष सोनटक्के म्हणाले की, नेताजींचे जीवन संघर्षमय होते.त्यांनी संघर्षातून देश स्वातंत्र्य करण्याकरिता इंग्रजांशी झुंज दिली. त्याचप्रमाणे आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना गंभीर व्हा,संघर्ष करा तेव्हाच तुमच्या पदरी यश मिळेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र टेकाडे, संचालन मयुरी उमप तर आभार प्रदर्शन कपिल आंबूडारे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सतिश बागडे, अनुसया रेवतकर, प्रल्हाद पडोळे,जास्मिन अंसारी, शुभम शेंडे, दामिनी खोडे,साहिल सलाम,गुंजन माकोडे, अभय धुर्वे, पल्लवी रेवतकर, गौरव बावणे,अश्विनी डहाके, यशवंत सिडाम, मोनिका मुंगभाते यांनी अथक परिश्रम घेतले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: