Wednesday, November 29, 2023
Homeराज्यअकोला | बौद्ध समाजाची स्वतंत्र व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बँक उभी करणार…डॉ.राजरत्न...

अकोला | बौद्ध समाजाची स्वतंत्र व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बँक उभी करणार…डॉ.राजरत्न आंबेडकर

Spread the love

अकोल्यात धम्म मेळाव्यात व्यक्त केला संकल्प…

अकोला – बुद्ध काळापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकाळात वंचित समाजावर अन्याय होत आले आहेत त्याला ब्राम्हणी व्यवस्था कारणीभूत आहे. आणि आता त्या वंचितांच्या आर्थिक विकासात सुधारणा झाली नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना केली आहे.

तर याच विषयावर प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहून डॉक्टरेट मिळवली आहे. या ग्रंथाला यावर्षी १००वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यामुळे समाजाचा विकास साधायचा असेल तर अर्थव्यवस्था बळकट असणे गरजेचे आहे.

ह्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होउन आजपर्यंत कोणत्याही समाज नेत्याने काम केले नाही म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राहिलेले अर्धवट काम पुर्ण करण्यासाठी बौद्ध समाजाची स्वतंत्र व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बँक उभी करणार असल्याचा संकल्प आज अकोल्यात आंतरराषट्रीय किर्तीचे नेते डॉ राजरत्न आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

त्यांनी बौद्ध समाज प्रबोधन करतांना सांगीतले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन आणि इंग्रज यांनी दिलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेत इंग्लंड येथे मिळविलेले कोलुमल अवॉर्ड केवळ देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी पुणे येथे केलेले आमरण उपोषण आणि ते उपोषण सोडविण्यासाठी तत्कालीन महार जातीच्या वस्तींवर हल्ले झाले त्यामुळे समाज वाचविण्यासाठी त्या पुणे करारावर सही केली.

मात्र आता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ राजरत्न आंबेडकर यांनी तो कोमुनल अवॉर्ड पुन्हा मिळविण्याचा संकल्प अकोल्यात भारतीय बौद्ध महासभा द्वारा आयोजीत धम्म मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. या धम्म मेळाव्याचे अध्यक्ष डॉ अरुण चक्रणारायन हे होते तर उद्घाटक म्हणून सेवानिवृत्त  उपविभागीय अभियंता सुनील शिरसाठ हे होते.

प्रमुख अतिथी म्हणून डॉ .भदंत खेमधममो, भंते धैर्यशील , भारतीय बौद्ध महासभेचे राज्यध्यक्ष दिनेश हनुमंते, राज्य संघटक वैभव  धबडगे, अमरावतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल आठवले, भदंत विजय कीर्ती अकोला,भदंत यश नागसेन मूर्तिजापूर,भदंत विशाल कीर्ती, पु.भदंत आनंद , भदंत प्रज्ञा बोधि ,भदंत उपाली , बौद्ध महासभेचे विभागीय अध्यक्ष रमेश अवचार,

वाशिम जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र छापाने, बुलढाणा जिल्हाध्यक्ष रामदास घेवंदे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सतीश इंगोलेउपास्थित होते. कार्यक्रमांचे स्वागताध्यक्ष सम्राट डोंगरदिवे हे होते. संचलन भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा कार्याध्यक्ष देवीलाल तायडे यांनी केले.

धम्म मेळावा यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे महानगराध्यक्ष सुनील शिरसाट,महिला जिल्हाध्यक्ष राजकन्या सावळे, महानगराध्यक्ष शोभा वानखडे, महानगर उपाध्यक्ष बाळासाहेब अंभोरे, यशवंत इंगोले, डॉ दयाराम तायडे, नंदरत्न खंडारे,सुनील तायडे, विजय कांबळे, जितेंद्र अहिर,राजू मोरे,रमेश वानखडे, गजानन वानखडे ,लॉर्ड बुद्ध फाउंडेशन वंदना संघाचे अध्यक्ष इरभान तायडे, सामाजिक कार्यकर्ते आनंद वानखडे, उमेश इंगळे आदींनी परिश्रम घेतले.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: