Thursday, May 2, 2024
Homeक्रिकेटIND vs ENG | यशस्वी जैस्वालची २०९ धावांची विक्रमी खेळी…भारताने पहिल्या डावात...

IND vs ENG | यशस्वी जैस्वालची २०९ धावांची विक्रमी खेळी…भारताने पहिल्या डावात ३९६ धावा…

Share

IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. भारतीय संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात भारत मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे खेळली जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या ३३६/६ होती. पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने विक्रमी पारी खेळत 209 धावा केल्यात…

यशस्वी जैस्वालचे द्विशतक
यशस्वी जैस्वालने 277 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आहे. त्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली आणि एकट्याने भारताची धावसंख्या 400 धावांच्या जवळ नेली. कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विनोद कांबळीने वयाच्या २१व्या वर्षी दोन द्विशतके झळकावली होती. त्याचवेळी सुनील गावस्कर यांनी वयाच्या २१व्या वर्षी द्विशतक झळकावले होते. आता यशस्वीने वयाच्या 22 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.

पहिल्या दिवशी काय झाले?
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली होती. रोहितने यशस्वीसह पहिल्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. तो 14 धावा करून बाद झाला. यानंतर यशस्वीने शुभमन गिलसह दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली.

शुभमन पुन्हा एकदा फ्लॉप झाला आणि 34 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार मारले. श्रेयस अय्यर २७ धावा करून झेलबाद झाला. आऊट होण्यापूर्वी श्रेयसने यशस्वीसोबत ९० धावांची भागीदारी केली. कसोटी पदार्पण करणारा रजत पाटीदारने 32 धावांची खेळी केली आणि तो दुर्दैवाने बाद झाला. त्याने यशस्वीसोबत 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वीने अक्षरसोबत 52 धावांची भागीदारी केली. अक्षरने 27 धावा केल्या.

तर श्रीकर भरत १७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या दिवशी यशस्वीने १७९ धावांच्या खेळीत १७ चौकार आणि पाच षटकार मारले आहेत. भारतीय संघ शनिवारी ४००+ धावा करणार असा अंदाज होता मात्र 396 मध्ये अवघा भारतीय संघ गारद झाला.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: