Thursday, February 22, 2024
Homeराज्यगैरवर्तन करणारे एपीआय मनोज लांडगे निलंबीत; अकोला पोलीस दलात खळबळ...

गैरवर्तन करणारे एपीआय मनोज लांडगे निलंबीत; अकोला पोलीस दलात खळबळ…

Share

अकोला – मनोज जरांगे पाटील यांची जालना ते मुंबई संभाव्य पायदळ यात्रा आणि त्यानंतर श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा या काळात दि.२० जानेवरी ते २८ जानेवारी पावेतो सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या रजा रद्द केल्या होत्या.या काळात अति महत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर राहनाऱ्या एपीआय मनोज दशरथ लांडगे यांच्यावर गैरवर्तवणूकिचा ठपका ठेवत शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित काळात पोलीस नियंत्रण कक्ष अकोला येथे त्यांना दररोज दोन्हि वेळच्या गणनेत उपस्थित राहावे लागणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.या आदेशामुळे अकोला पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, सपोनि मनोज दशरथ लांडगे सी.एम.एस सेल अकोला येथे नेमणूकिस होते. ते ४ दिवस किरकोळ रजेवर असतांना दि.१० जानेवारी रोजी कर्तव्यावर हजर होणे अपेक्षित होते. मात्र प्रकृतीत अचानक बिघाड झाल्याचे कारण देत डॉक्टररांनी बेड रेस्ट चा सल्ला दिला असल्याचे कारण त्यांनी मोबाइल द्वारे कळविले.
मात्र या नंतर कुठल्याही वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे सादर न करता व वरिष्ठांना कुठलीही पूर्व सूचना न देता परस्पर रजेवरून रुग्ण निवेदन केले होते.

दिनांक १९/०१/२०२४ अन्वय मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जालना ते मुंबई अशी संभाव्य पायी यात्रा करणार असल्याने त्यांचे समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कायदा व सुरक्षिततेच्या दृष्टीने दि २०/०१/२०२४ ते २८/०१/२०२४ पावेतो सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व प्रकारच्या रजा बंद करण्यात आल्या होत्या. तसेच एपीआय मनोज लांडगे अति महत्वाचे (रामाप्रतिष्ठान अयोध्या) बंदोबस्तासाठी गैरहजर असल्याचे दिसून आलेत.

त्यांच्या या गैरवर्तणुकीबद्दल निलंबित करण्याबाबत आवश्यक असल्याची खात्री झाल्याने मनोज लांडगे विरुध्द चौकशी सुरु करण्याचे अधीन राहुन, मुंबई पोलीस (शिक्षा आणि अपिले) नियम १९५६ मधील नियम ३ (१) (अ-२) अन्वये पोलीस अधीक्षक अकोला यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन ३१ जानेवारी रोजी सदरचे आदेश निर्गमित केल्याचे दिनांकापासुन शासकीय सेवेतून तात्काळ निलंबीत करण्यांत येत असल्याचे निलंबन आदेशात नमूद आहे.

प्रस्तुत आदेश अस्तित्वात असे पर्यंतच्या कालावधीत सपोनि, मनोज लांडगे, यांचे मुख्यालय हे पोलीस नियंत्रण कक्ष अकोला हे राहणार असून पोलीस अधीक्षक, अकोला यांचे पूर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडून अन्यत्र कोठेही जाता येणार नाही.

निलंबन कालावधीमध्ये सपोनि, मनोज लांडगे, यांना कोणत्याही प्रकारची खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. आणि जर त्यांनी अशा प्रकार नोकरी किंवा व्यवसाय केला तर त्यांची ही कृती महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ मधील नियम १६ अन्वये गैरवर्तणुक गणण्यात येईल व त्यामुळे ते शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरतील. शिवाय त्यांना देय असलेला निर्वाह भत्ता ते गमावतील असे देखील आदेशात नमूद केले आहे.

या पूर्वी सुद्धा एपीआय मनोज लांडगे एक वर्षापेक्षा अधिक काळ परस्पर सिक मध्ये गेले होते. या बाबत बार्शीटाकळी येथील गजानन कोगदे यांनी थेट पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केली होती. असे असतानाही या कालावधीत त्यांचे वेतन सुरू असल्याचे बोलले जाते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: