Friday, September 22, 2023
Homeगुन्हेगारीशेअर मार्केट मध्ये गुरुजीने केली मोठी गुंतवणूक...गुरुजीसह सातजणांची झाली १ कोटीला फसवणूक...

शेअर मार्केट मध्ये गुरुजीने केली मोठी गुंतवणूक…गुरुजीसह सातजणांची झाली १ कोटीला फसवणूक…

नांदेड – महेंद्र गायकवाड

शहरातील जुना कौठा भागातील मुख्याध्यापक व अन्य सात मित्रांना विश्वासात घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या मोबदल्यात कमी कालावधीत जास्त परतावा, विदेश दौरा आणि महागड्या गाड्यांची भेट देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. यात मुख्याध्यापकासह सह सात जणांची जवळपास एक कोटी चौदा लाख 53 हजार 700 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

शहरातील सिडको जुना कौठा भागातील श्रीपादनगर येथे राहणारे शिक्षकी पेशातील मुख्याध्यापक आनंद नागनाथराव रेणुगुंटवार (वय 54) हे एका लग्न सोहळ्यासाठी पंढरपूरला गेले होते. तेथे त्यांची कॅपिटल सिकर ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स एलएलबी कंपनीचे मुख्य मॅनेजमेंट डायरेक्टर रोहितसिंग धर्मासिंग सुभेदार रा. दत्तनगर, किर्लोस्करवाडी रोड पलूस, जिल्हा सांगली यांच्यासोबत भेट झाली.

त्यानंतर भेटीचे रुपांतर चांगल्या ओळखीत होऊन त्यांनी आनंदराव रेणुगुंटवार आणि त्यांच्या इतर साथीदारांना मार्च २०२१ ते माहे ऑगस्ट २०२२ दरम्यान रोहितसिंग धर्मासिंग, डायरेक्टर डॉक्टर बाबुराव हजारे राहणार कोल्हापूर व कंपनीचे पदाधिकारी यांनी भुलवून गंडा घातला. यात शिवाजी गणपत हजारे धनगर गल्ली सिद्धनेर्ली कोल्हापूर, बाबासो भोपाल धनगर आणि इंद्रजीत भारत म्हाळुंगे राहणार शेंद्री तालुका गडहिंग्लज सेंद्रिय बाड्याची वाडी कोल्हापूर व इतरांनीही फसवणूक केली.

या प्रकरणी आनंद रेणगुटवार यांनी दिलेल्या फिर्यादिवरून पाच जनाविरुद्ध वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मंठाळे हे करित आहेत आजकाल फसवूणिकच्या बाबतीत सोशल मीडियावर विविध वृत्त येत असताना सुद्धा कांही सुशिक्षित नागरिक अनेक अमिषाला व भुलथापानां बळी पडत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: