Friday, February 23, 2024
HomeMarathi News Todayगुजरातचे जहाज भरकटून मुरुड-जंजिरा किनाऱ्यावर खडकात अडकले...दहा जणांना वाचवण्यात यश...Video

गुजरातचे जहाज भरकटून मुरुड-जंजिरा किनाऱ्यावर खडकात अडकले…दहा जणांना वाचवण्यात यश…Video

Share

किरण बाथम…रायगड

मुरूड तालुक्यातील पद्मदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस 9 ऑगस्ट रोजी रात्रीपासून असणाऱ्या समुद्रात गुजरातचे जहाज अडकले होते. हे जहाज आज सकाळी तालुक्यातील मोरे गावाच्या समुद्र किनाऱ्यापासून साधारणपणे एक किलोमीटर च्या अंतरावर आले.

त्यातील कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांसहित मुरूड प्रशासनातील अधिकारी प्रयत्न करीत असल्याची माहिती मुरूड तहसिलदार रोहन शिंदे यांनी दिली.

काल रात्री पासून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी देखील प्रशासन व संबंधिताना कायम संपर्क ठेऊन सहकार्य केल्याचे केप्टन आदित्य निकम यांनी सांगितले.याबाबत जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे हे मुरूड तहसिलदार यांच्याकडून वेळोवेळी माहिती घेत होते. आता सर्व दहाजणांना सुखरूप रेस्कीयू करण्यात आले आहे…


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: