Monday, May 6, 2024
Homeराज्यप्रख्यात रामनगरीत ६ नोव्हेंबरला भव्य शोभायात्रेचे आयोजन - शोभायात्रेच्या आयोजनासाठी एकवटली माणुसकी...

प्रख्यात रामनगरीत ६ नोव्हेंबरला भव्य शोभायात्रेचे आयोजन – शोभायात्रेच्या आयोजनासाठी एकवटली माणुसकी…

Share

  • यंदा होणार ४१ वी शोभायात्रा
  • पक्षभेद सोडुन राजकियांचा सामुहीक पुढाकार व हातभार

रामटेक – राजु कापसे

प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरीमध्ये दरवर्षी त्रिपुरा पोर्णिमा दरम्यान भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते मात्र कोरोना महामारीच्या मागील बिकट व गंभीर संकटामुळे या कार्यक्रमावर कोव्हीड – १९ नियमांचे विरजन पडलेले होते यामुळे नागरीकांची घोर निराशा झालेली आहे. शोभायात्रेमध्ये ५० च्या जवळपास झाक्यांचा समावेश राहात असतात व हे दृष्य पहाण्यासाठी शहरासह आसपाच्या गावातील हजारो लोक यावेळी येथे आपली हजेरी लावत असतात.

आता कोरोना महामारीचे संकट गेल्याने यंदा भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचे आयोजन समितीकडुन सांगण्यात आले आहे. रामनगरीतील शोभायात्रा दुरवर प्रसीद्ध आहे. शहरामध्ये या वर्षी ४१ वी (एक्केचाळीसवी ) शोभायात्रेचे येत्या ६ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता आयोजन करण्यात आलेले आहे. भारतीय जनसेवा मंडळाद्वारे सदर शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले असुन या मंडळाचे अध्यक्ष पर्यटक मित्र तथा रामधाम चे संस्थापक चंद्रपाल चौकसे हे आहेत.

शोभायात्रेचे मुख्य आकर्षन प्रसीद्ध चित्रपट अभिनेते शाहबाज खान असणार आहे. शोभायत्रेची सुरुवात स्वर्गीय संत गोपाल बाबा यांनी केली, त्यांनी तब्बल ३९ वर्षे ती उत्तम प्रकारे चालवली. भारतीय जनसेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली शोभायात्रा समिती स्थापन करण्यात आली आहे. तीन गटात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. वैकुंठ चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी झाक्यांची शोभायात्रा निघेल.

या झांक्या अठराभुजा गणेश मंदिरापासून निघेल व लंबे हनुमान मंदिरामार्गे जात पुढे नेहरू मैदानावर समापन होईल. शोभायात्रेच्या यशस्वीतेसाठी संत तुकाराम महाराज, भारतीय जनसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव डी.मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, सुभाष बघेले, अशोक पटेल, धनराज काठोके, डॉ.शंकरराव चामलाटे, विनायक डांगरे, शेखर बघेले,

शोभायात्रा समितीचे अध्यक्ष नथू घरजाळे, रुषी किम्मटकर, उपाध्यक्ष सुमित कोठारी, सचिव रितेश चौकसे, अमोल गाडवे, नीलेश पटेल, रजत गजभिये बीकेंद्र महाजन, निर्भय घाटोळे, धर्मेश मकरंद, विनायक कृष्णा, मा. बालचंद खोडे प्रयत्नशील आहेत. ७ नोव्हेंबरला त्रिपुरी पौर्णिमा असून रथयात्राही निघणार आहे. ८ नोव्हेंबर रोजी मंडईचे कार्यक्रम होणार आहेत.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: