Wednesday, February 21, 2024
Homeराज्यअवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी…

अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया जिल्ह्यात 1.90 लक्ष हेक्टरवर धान पिकाचे उत्पादन घेतले जात असून सध्या जिल्हयातील शेतकरी मोठया प्रमाणावर कडधान्य, भाजीपाला, फळबाग व अन्य पिके घेतली जातात. परंतु मागील दोन दिवसापासून संपूर्ण जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालेला असून निसर्गाच्या प्रकोपाने शेतकरी संकटात सापडला आहे.

या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी यासाठी खासदार प्रफुलभाई पटेल यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या मार्गदर्शनात आज गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांच्या उपस्थितीत यशवंत गणवीर,

बाळकृष्ण पटले, किशोर तरोणे, लोकपाल गहाणे, निरज उपवशी, माधुरी नासरे, कुंदा दोनोडे, रुचिता चव्हाण, नरहरप्रसाद मस्करे, दिलीप डोंगरे, नितीन टेंभरे, शैलेश वासनिक, सुनील पटले, अर्जुन मेश्राम, प्रमोद कोसरकर या शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.

मागील दोन काही दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील धान, भाजीपाला, फळबाग, मका व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. कापणीस आलेला धान, कापणी झालेल्या धानाचे कडपे, धान कापणी झाल्यानंतर पेरण्यात आलेले चना, गहू, मका, वटाणा, तूर व इतर कडधान्य यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

तसेच कापणी करुन शेतात तयार केलेली पुजने यांचे ही नुकसान झालेले आहे. या सर्वांचे पंचनामे करून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तात्काळ नुकसान भरपाईची करून मदत करावी अश्या प्रकारचे निवेदन जिल्हाधिकरी, गोंदिया मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: