Friday, May 17, 2024
Homeराज्यउद्या १५ ऑक्टोंबर ला रामधाम येथील वैष्णोदेवी मंदीरात होणार घट स्थापना...

उद्या १५ ऑक्टोंबर ला रामधाम येथील वैष्णोदेवी मंदीरात होणार घट स्थापना…

Share

रामटेक – राजु कापसे

‘रामधाम’ मध्ये नवरात्री उत्सवाची तयारी जोरात सुरू असुन उद्या १५ ऑक्टोंबर ला वैष्णोदेवी मंदीरात विधीवत घटस्थापना होणार आहे. १५ ऑक्टोंबर ते २४ ऑक्टोंबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तेव्हा ज्यास्तीत ज्यास्त भावीक भक्तांनी देवीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन पर्यटक मित्र तथा रामधाम तिर्थक्षेत्राचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी केलेले आहे.

१५ ऑक्टोंबर ला सकाळी ९ वाजता माता वैष्णोदेवी मंदिरात विधिवत घट स्थापना केली जाईल. दुपारी ४ वाजता भक्तांच्या मनोकामना इच्छा पुर्तीकरिता अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. यावेळी पुजा-पाठ, सप्तीपाठ, आरती करण्यात येणार आहे.

नवरात्री चे पुर्ण ९ दिवस दररोज भक्ती संगित, माता जागरण, रास गरबा आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. २४ ऑक्टोंबर ला रात्री होम हवन तथा कन्या भोजन कार्यक्रम केल्या जाईल. रामधाम’ येथे विश्वातील सर्वात मोठया ‘ओम’ ची निर्मिती केल्या गेली आहे, ज्याचे नांव “लिमका बुका ऑफ रेकॉर्ड मध्ये शामील झाले आहे.

‘रामधाम’ येथे भाविकांना एकाच ठिकाणी बाबा अमरनाथ, द्वादस ज्योतिर्लिंग, अष्ट विनायक, माता वैष्णो देवी आणि विश्व प्रसिद्ध ‘ओम’ चे दर्शनासोबत भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्णच्या जीवन चरित्रावर आधारित झांकीयाँ पहावयास मिळते. तसेच शिव ‘शिव बारात’ चे दर्शन घेता येईल.

यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारीत श्रीकृष्णाचे गऊ प्रेम, गोवर्धन पर्वत, विष्णु लोक, विराट दर्शन, सुवी बर्ड पार्क मध्ये देश विदेशी पक्षी पाहावयास मिळतात तथा लाईट हाऊस वॉटर पार्क मध्ये विविध प्रकारच्या स्लाइडस् अनुभवायला इत्यादी अनेक दृश्य पहावयास मिळतात.

तसेच भारतातील विभिन्न क्षेत्रातून संग्रहीत केलेले विविध प्रकारचे पाषाणाचे संग्रहालय आणि नंतर राजस्थान आणि इतर प्रांतातून आलेल्या लोक कलाकारांचे सामुहीक नृत्य, जादु चे खेल आदि मनोरंजक कार्यक्रमाद्वारे भाविकांचे मनोरंजन घडून येते. भारतीय संस्कृति आणि संस्काराचे दर्शन ‘रामधाम’ येथे घडून येते. रामधाममध्ये होणा-या नवरात्री उत्सवाला भक्तांनी भेट देण्याचे आव्हान रामधामचे – संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: