Saturday, April 27, 2024
Homeराज्य३ लाख रुपये लुटणाऱ्या महिलांचि टोळी अटक...

३ लाख रुपये लुटणाऱ्या महिलांचि टोळी अटक…

Share

पातूर पोलिसांचि कारवाई

पातूर – निशांत गवई

फेब्रुवारी महिन्यात प्रवासा दरम्यान चार महिलांनि बॅग मधून लाखो रुपये लंपास करण्यात आले होते या प्रकरणात महिलांचि टोळी अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे कि नांदेड येथील शामसुंदर दरग व त्यांच्या पत्नी ह्या अकोला येथे दिनांक 21 फेब्रुवारी ला आपल्या साडू च्या घरी डोहाळे कार्यक्रम साठी निघाले असता वाशीम येथून काही महिला सुद्धा बस मध्ये बसल्या बस प्रवाश्यानी भरगच्च असल्यामुळे ह्या महिलांनि दरग दापणत्याला बसण्या साठी जागा मागितली असता वेळ प्रसंग येताच बॅग मधील असलेली 3 लाख रुपये रोख ह्या महिलांनि लंपास करीत.

पातूर येथील जुने बस स्थानक वर उतरून फरार झाल्या सदर घटनेबाबत अनभिज्ञ असलेल्या दरग दापणत्या ला अकोला येथे पोहचल्या वर बॅग उघडी दिसताच त्यांनी बॅग खोलून पाहिली असता बॅग मधील रोख 3 लाख रुपये लंपास झाल्या चे समजताच त्यांच्या पाया खालील वाळू सरकली त्यांनी तात्काळ अकोला येथील पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला असता या प्रकरणतील महिला पातूर येथे उतरल्या चा त्यांना दाट संशय होता,

या गंभीर प्रकरणात पातूर पोलीस स्टेशन ला फिर्यादी शामसुंदर हरिप्रसाद दरग वय 58रा. मजनपुरा नांदेड च्या तक्रारी वरून चे ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली आरोपी महिला दिना प्रभा गाझ वय 30, मेघना सचिन गाझ वय 20, अंजली राजू गाझ वय 20, वेणीला विनोद गाझ वय 25, अनु अरविंद गाझ वय 30 सर्व रा. आरधापूर जि. नांदेड यांना अटक करण्यात आली असून आज त्यांना न्यायलयात नेले असता आरोपी महिलांना दिनांक 9 मार्च पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे या प्रकरणात ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली हे. कॉ. संजय पाचपोर व अभिजित असोलकर यांनी कारवाई करीत महिलांना अटक केली.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: