Thursday, April 25, 2024
Homeराज्यमोठी बातमी | रेपनपल्ली च्या जंगलात चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी घातले कंठस्नान...

मोठी बातमी | रेपनपल्ली च्या जंगलात चार नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी घातले कंठस्नान…

Share

गडचिरोली – मिलिंद खोंड

अहेरी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या रेपनपल्लीच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये काल रात्री भीषण चकमक झाली. या चकमकीत चार नक्षल्यांचा खात्मा झाल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी सर्चिग ऑपरेशन सुरू केले असल्याचे सांगितले जात आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. अहेरी उपपोलीस मुख्यालयातून सी-60 आणि सीआरपीएफ क्यूआरटीची अनेक पथक यासह अतिरिक्त एसपी ऑपरेशन यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात परिसरात शोधमोहीम सुरु आहे.

पुढेआलेल्या माहितीनुसार, परिसरात असलेल्या कोलामार्का जंगलात येथे आज पहाटे सर्च ऑपरेशन सुरु असताना सी-60 दलांच्या एका पथकावर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. याला पथकांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. गोळीबार थांबल्यानंतरपरिसराची झडती घेतली असता 4 पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

गोळीबाराच्या ठिकाणाहून एक एके 47, एक कार्बाइन आणि 2 देशी बनावटीचे पिस्तूल, नक्षलवादी साहित्य आणि सामान जप्त करण्यात आले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीव्हीसीएम वर्गेश, डीव्हीसीएम मागटू, पलटन सदस्य कुरसंग राजू आणि पलटन सदस्य कुडिमेट्टा व्यंकटेश यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.


Share
Milind Khond
Milind Khondhttp://mahavoicenews.com
मिलिंद खोंड, गेल्या 18 वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल दुर्गम भागात पत्रकारितेचा अनुभव ..पत्रकारितेत पदव्युत्तर पदवी..गोंडवाना विद्यापीठ येथे जन संवाद विभागात गेस्ट प्रोफेसर..तरूण भारत, हिंदुस्थान समाचार,मी-मराठी, न्यूज स्टेट वृत्तवाहिनी चा अनुभव
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: