Friday, May 10, 2024
Homeराज्यनांदेड जिल्ह्यातील चार व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र : महाराष्ट्रातील अठरा लोकांच्या...

नांदेड जिल्ह्यातील चार व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवण्यास अपात्र : महाराष्ट्रातील अठरा लोकांच्या यादीत चौघाचा समावेश…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

महाराष्ट्रातील अठरा लोकांना निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले असून निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या यादीत जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे या चौघाना आता निवडणूक लढविण्यात येणार नाही.

देशात व राज्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याच्या पूर्वसंध्येला निवडणूक आयोगाकडून देशभरातील अपात्र व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीत महाराष्ट्रातील एकूण अठरा जणांचा समावेश आहे.

निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले असून अशा लोकांची यादीच निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या लोकांना लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही.

या यादीत जिल्ह्यातील नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मुदसरुदिन अलिमुदिन, लोहा मतदार संघातील पांडुरंग टोलाबा वान्ने, किनवट विधानसभा मतदारसंघातील विशाल दत्ता शिंदे, नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील इम्रान बशर यांचा समावेश आहे.


Share
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: