Saturday, April 27, 2024
Homeराज्यनांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन...

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार यांचे अपघाती निधन…

Share

पुणे-सोलापूर हायवेवर झाला कारचा अपघात

बिलोली – रत्नाकर जाधव

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव जमनाजी एंबडवार यांचे पुणे – सोलापूर हायवेवर सोलापूर पासून ४० किलोमीटर अंतरावर माळवत-चिखली या गावाजवळ दि.१ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अपघातात दुःखद निधन झाले.

नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबाराव एंबडवार हे आपल्या मुलाला पुणे येथे भेटण्यासाठी कारने जात असताना पुणे- सोलापूर हायवेवर सोलापूर पासून ४० किलोमीटर अंतरावर माळवत-चिखली या गावाजवळ दि.१ जुलै रोजी रात्री १० च्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकवर कार आदळून झालेल्या अपघातात झाला.यात बाबाराव एंबडवार यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

अपघात घडल्यानंतर जवळपास दीड तास त्यांना मदत मिळू शकली नाही त्यामुळे ते कार मध्येच अडकून होते. दीड तासानंतर क्रेनच्या सहाय्याने त्यांचा मृतदेह कारमधून बाहेर काढण्यात आला.या अपघातात चालक करीमखान पठाण व रामचंद्र मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत.

त्यांच्यावर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.तर एंबडवार यांचे शवविच्छेदन करण्यात येत असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे.

बाबाराव एंबडवार त्यांचा राजकीय प्रवास हा कोल्हेबोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच,सोसायटीचे चेअरमन,कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे १२ वर्ष सभापती,बिलोली पंचायत समितीचे १९८२-९७ या काळात सभापती,जिल्हा परिषदेचे ते १४ ऑगस्ट २००१ ते २० मार्च २००२ व १९ एप्रिल २००४ ते १७ फेब्रुवारी २००५ या काळात अध्यक्ष दोन वेळा उपाध्यक्ष, आरोग्य व शिक्षण सभापती असा त्यांचा राजकीय प्रवास होता.

तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटातून पाच वेळेस त्यांनी सदस्य म्हणून निवडून आले. तसेच एक वेळेस आरळी जिल्हा परिषद मधून बिनविरोध सदस्य म्हणूनही निवडून आले.चेतना शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते.माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर हे बाबाराव एंबडवार यांचे राजकीय गुरू होत.

बाबराव एंबडवार यांच्या अपघाती निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली असून अनेक राजकीय मंडळींनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या पार्थिवावर कोल्हेबोरगाव येथे आज २ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,दोन मुली,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

अपघाताची माहिती कळताच त्यांचे पुत्र सुनील एंबडवार, संतोष एंबडवार,डॉ.वर्षा एंबडवार व मुख्याध्यापक अशोक दगडे यांनी अपघात स्थळी पोहचले आहेत.तर त्यांची मोठी मुलगी व जावई दुबईला असून अंत्यदर्शनासाठी निघाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी संगितले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: