Monday, May 6, 2024
Homeराज्यमाजी मंत्री मा. जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर अंतर्गत आठ जणांचे...

माजी मंत्री मा. जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर अंतर्गत आठ जणांचे मोतीबिंदू ऑपरेशनची ९२ बॅच पार पडली…

Share

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री मा. जयंतरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हा अध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली अविरतपणे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबीरा अंतर्गत आज ८ जणांची मोतिबिंदू आँपरेशनची ९२ वी बँच पार पडली, सदरचे मोतिबिंदु आँपरेशन पुर्णपणे मोफत करण्यात आले.

यावेळी पेशंटच्या भेटप्रसंगी राष्ट्रवादी कुपवाड शहर अध्यक्ष तानाजी गडदे ,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष उत्तम(आबा) कांबळे ,संगीता जाधव ,कामगार सेल चे नितीन माने, राहुल हिरोडगी, आशिष पवार, सनी गाडे, संतोष जाधव, अशोक पाटील यांच्या सह प्रमुख सचिव डॉ शुभम जाधव, रोहित आठवले आदी उपस्थित होते.

या कामाचा पाठपुरावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रमुख सचिव व विद्यार्थी शहरजिल्हा अध्यक्ष डॉ शुभम जाधव , निलेश शहा, रोहित आठवले, अजीम मुल्ला, यांनी केला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: