Wednesday, February 21, 2024
Homeराज्यस्वच्छता मॉनिटर मोहिमेत आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालय जिल्ह्यात प्रथम...

स्वच्छता मॉनिटर मोहिमेत आलापल्ली येथील राणी दुर्गावती विद्यालय जिल्ह्यात प्रथम…

Share

अहेरी – मिलिंद खोंड

राणी दुर्गावती माहिती मराठीत: वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी चे उपाध्यक्ष. बबलू हकीम.शाहीन जमीर हकीम, नागपूर विभागीय अध्यक्षा , राष्ट्रवादी महिला काँग्रेस, गडचिरोली जिल्हा, . राजकुमार निकम साहेब, शिक्षणाधिकारी (माध्यमिक). श्री.अमर गेडाम, जिल्हा समन्वयक. श्री.रोहित आर्या, #स्वच्छतामोनिटरचे राज्य समन्वयक , मुंबई. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, विद्यार्थ्यांमार्फत #स्वच्छतामॉनिटर ही मोहीम राबविण्यात येऊन, विडिओंच्या माध्यमांतून जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमात राणी दुर्गावती विद्यालय,आलापल्ली चे महाराष्ट्रातून शीर्ष ५० (Top50) आणि गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम पारितोषिक मिळविले असून, आज दिनांक २४/०४/२०२३ रोजी… मंत्रालय,मुंबई येथे मा. श्री. दीपक केसरकर,शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते, श्री. रंजीत सिंह देओल, शिक्षण सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच श्री. काझी साहेब, सह-सचिव ह्यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापक श्री. गजानन शामराव लोनबले, शाळा समन्वयक श्री. सत्येंदर लक्ष्मीपति सीलमवार व विद्यार्थी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ह्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंदानी मोलाची कामगिरी बजावली…


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: