Friday, May 3, 2024
Homeव्यापारभुसावळ मंडळात उत्साहात पार पडला "रोजगार मेळावा"...

भुसावळ मंडळात उत्साहात पार पडला “रोजगार मेळावा”…

Share

न्युज डेस्क – केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दिनांक 28.10.2023 रोजी भुसावळ मंडळात “रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला होता. यावेळी २६ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती मिळाल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सर्व उमेदवारांनी रेल्वेचे आभार व्यक्त करत रेल्वेतील भरती प्रक्रिया वेळेवर आणि पारदर्शकतेने पार पडल्याचे सांगितले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इति पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन), सुनील कुमार सुमन, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी श्री एन.एस.काझी उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी श्री व्ही.एस.वडनेरे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कल्याण निरीक्षक, कार्मिक विभाग, भरती विभाग, S&T विभाग, विद्युत विभाग आणि अभियांत्रिकी विभाग यांनी सहकार्य केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: