Friday, May 17, 2024
Homeराज्यपंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा ११८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा ३०...

पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा ११८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा ३० ऑक्टोबर पासून…

Share

सांगली – ज्योती मोरे

पंतबाळेकुंद्री येथे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा ११८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर ते बुधवार दिनांक 1 नोव्हेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. 30 ऑक्टोबरला सकाळी आठ वाजता श्रीपंत वाडा समादेवी गल्ली बेळगाव येथून प्रेम ध्वजाची मिरवणूक निघणार आहे.

दुपारी दोन वाजता मिरवणूक श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील पंत वाड्यात पोहोचणार आहे. सायंकाळी पाच वाजता श्रीपंत वाडा येथून प्रेमध्वज मिरवणूक सुरू होणार असून,रात्री आठ वाजता प्रेम ध्वजारोहणाने उत्सवास प्रारंभ होणार आहे.

दिनांक 31 ऑक्टोबर रोजी पहाटे पाच वाजता श्री पुण्यस्मरण कार्यक्रम होणार आहे. या पुण्यस्मरण कार्यक्रमानंतर गावातील पंतवाड्यातून पालखीची मिरवणूक निघून दुपारी आमराईतील श्रीपंत स्थानी येऊन त्यानंतर रात्री आठ ते बारा पर्यंत पालखी सेवा होईल.

बुधवार दिनांक 1 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता श्रींचा महाप्रसाद होईल. दुपारी तीन ते पाच पर्यंत प्रेमानंद टिपरी कार्यक्रम होईल. सायंकाळी सहा वाजता श्रींच्या पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होणार आहे. तरी सर्व भक्तांनी उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दत्त संस्थान पंत बाळेकुंद्री उत्सव समितीने केले आहे.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: