Homeराज्यवृद्धाश्रम मनसर येथे साहित्य वाटप...

वृद्धाश्रम मनसर येथे साहित्य वाटप…

Share

रामटेक – राजु कापसे

दिनांक २६ जानेवारी २०२४ रोज शुक्रवारला प्रजासत्ताक दिवसाचे औचित्य साधून व महामानव संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला हार अर्पण करून “एक हात मदतीचा सेवाभावी बहुद्देशीय संस्था “, जांब च्या वतीने वृद्धाश्रम मनसर येथे परिवारापासून वंचीत तसेच परमप्रीती महानुभाव आश्रम तीर्थक्षेत्र, मनसर येथे असलेल्या वडीलधाऱ्या लोकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लॅंकेट व काही फळ वस्तू वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मण मेश्राम उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून वृद्धाश्रम संचालक कैलास रामटेके, व्यवस्थापन करूना रामटेके,मुख्य अतिथी म्हणून हेमराज चोखांद्रे सर, चौरे सर उपस्तिथ होते. कार्यक्रमाचे संचालन देवानंद नागदेवे यांनी केले तर प्रास्ताविक सबधिर बोरकर यांनी केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य बिपीन बागडे,आरजू बोरकर,श्रीकांत उके,अमित लांजेवार,रोहित मेश्राम,रोशन पाटील,कैलास बाहे,हर्षल रामटेके,विलास उके,योगीराज उके,अनिता फुलझेले,पूजा रागोते, उमेश गभने,सत्यदर्शन उके,दिवाकर बारामाते,विभा मेश्राम,मनीषा बागडे,स्नेहल मेश्राम,सुमित गडपायले,गौतम रामटेके,राहुल उके, ऋषिकेश बाजनघाटे, अविनाश चिनचुलकर, प्रज्वल ज्वंजाल, निशांत खरवड़े,प्रवीण फुलझेले आदी उपस्तीत होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: