Saturday, May 11, 2024
Homeराज्यअंबाळा मध्ये नारायण स्वामी पुण्यतिथी निमित्त रोगनिदान शिविर...

अंबाळा मध्ये नारायण स्वामी पुण्यतिथी निमित्त रोगनिदान शिविर…

Share

रामटेक – राजु कापसे

प्रशिद्ध धार्मिक स्थळ रामटेक येथील अंबाळाचा नारायण टेकडीवर श्री सद्‌गुरू नारायण स्वामी व श्री दत्तगुरू बालयोगी छोटू महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुश्री साध्वीजी महाराज यांचे हस्ते दीप प्रज्वल करून सोमवार पासून सुरुवात झाली आहे. माजी आमदार गीरीष व्यास यांनी भेट दिली.

अभिषेक व आरती मध्ये भाग घेतला. माजी खासदार डॉ. विकास महात्मे यानी अभिषेक व आरती मध्ये भाग घेतला व परिसर बघून समाधान व्यक्त केले. डॉ. विकास महात्मे नेत्र पीढ़ी तर्फे शिबिर आयोजीत केले. शिबिर मधे ११० लोकांचे डोळे चेक केले व २२ लोकांना मोतीया बिंदूचे निदान झाल्याने त्यांचे लवकरच निशुल्क मोतीया बिंदू ऑपरेशन होईल असे ते म्हणाले.

२२ डिसेंबरला डॉ. बापू शेलोकर यांचे आहार विषय‌क मार्गदर्शन झाले. त्यांनी सांगीतले की डायबिटीज व हार्टचे रुग्ण वाढत आहेत त्यावर उपाय म्हणजे जिवनशैलीत बदल करावे. मिलेटच्या भोजन मध्ये समाविष्ट करा. नत्थू घरजाळे यानी एक्यूप्रेशर उपचार प‌द्धती विषयी माहीती दिली व विविध जटील रोगांवर उपचार केले.

२३ डिसेंबरला डॉ. खुशाल शरणांगत यांचे हृदय जांच शिबीर राहिल. प्रत्येक दिवसी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महाप्रसाद राहिल. नऊ दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे २६ डिसेंबरला गोपाल काल्याने समारोप होईल. महोत्सवात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने साधक येत आहे. आयोजनासाठी सुश्री साध्वीजी महाराज यांच्या मार्गदर्शनात साधक प्रयत्नरत आहेत.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: