Friday, September 22, 2023
Homeगुन्हेगारीदेवलापार । लुटमारीने गाजला न्यु तोतलाडोह परीसर…अज्ञात आरोपीने मारहाण करून लुटला लाखोंचा...

देवलापार । लुटमारीने गाजला न्यु तोतलाडोह परीसर…अज्ञात आरोपीने मारहाण करून लुटला लाखोंचा ऐवज…

राजु कापसे
रामटेक

देवलापार पोलीस स्टेशन हद्दीमध्ये येणाऱ्या न्यु तोतलाडोह जंगल शिवारात काल दि. ३ ऑगस्ट ला दुपारी ५ च्या सुमारास लुटमारीची घटना घडल्याने संपुर्ण देवलापार परीसर गजबजला.

पोलीस स्टेशन देवलापार येथुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेंद्र भरतरामजी शिवनकर वय ४० वर्ष हल्ली मुक्काम शितलवाडी हा भारत फायनान्समध्ये डेली कलेक्शनचे काम करतो. दरम्यान तो काल दि. ३ ऑगस्ट ला आपल्या मोटारसायकल क्र. एम.एच. ३५ ए.के. ८८९६ ने दुपारी पाच च्या सुमारास सिंदेवानी देवलापार परीसरात कलेक्शन करण्याकरीता गेला असता न्यु तोतलाडोह पासुन अर्धा किलोमीटर अंतरावर व हायवे मार्गावर पोहोचन्यापुर्वी कच्च्या डांबरी रस्त्याने येत असतांना अचानक एक अनोळखी इसम हातात लाकडी दंडा घेऊन जंगलातुन आला व शिवनकर याच्या डोक्यावर वार केला व लगेच शिवनकर याच्या जवळील बॅग घेऊन परत जंगलात पळुन गेला.

यानंतर शिवनकर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवनकर याने देवलापार पोलीसांना दिलेल्या बयानानुसार बॅग मध्ये दोन ते अडीच लाखांची रोकड व एक पाच हजार रुपयांचा टॅब होता तसेच लुटमार करून पळुन जाणारा आरोपी हा लठ्ठ होता असे शिवनकर याने आपल्या बयानात देवलापार पोलीसांना सांगीतले आहे. त्यानुसार देवलापार पोलिसांनी अज्ञात 8 आरोपीविरुद्ध अपराध क्र. १५५/२२ कलम ३९४ भादवी नुसार गुन्हा नोंद केलेला असुन देवलापार पोलिसांकडून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: