Monday, May 6, 2024
Homeराजकीयसंजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी…धमकीमध्ये गायक सिद्धू मुसेवाला यांचा उल्लेख…

संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी…धमकीमध्ये गायक सिद्धू मुसेवाला यांचा उल्लेख…

Share

शिवसेना नेते संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत लॉरेन्स बिश्नोई टोळीने बॉलिवूड स्टार सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासोबतच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई टोळीचाही आरोप आहे.

पोलिसांनी सांगितले की, शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगने संजय राऊत यांना सिद्धू मुसेवाला प्रमाणे मारले जाईल, अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांनी फिर्याद दिली असून, त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा काढून घेण्यात आली. आता आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.

यावर संजय राऊत म्हणाले…या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना विरोधकांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. आम्ही धमक्याची माहिती देतो तेव्हा गृहमंत्री चेष्टा करतात. हा स्टंट आहे म्हणतात. ठाण्यातील एका गुंडाने धमकी दिली. त्यात मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकचं नाव आहे. ते गांभीर्याने घेतलं नाही. मी माहिती दिली. काल आलेल्या धमकीचा मला राजकीय इश्यू करायचा नाही. विरोधकांना आलेल्या कोणत्याही धमक्या हे सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. पोलीस यंत्रणा फक्त विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, खोट्या कारवाईसाठी वापरत आहे. असंच चालू राहू द्या. आम्ही आहे त्या परिस्थितीला सामोरे जाऊ, असं ते म्हणाले.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: