Saturday, April 27, 2024
Homeराज्यडाॅ. अजय कांत यांची काँग्रेस नेते देवानंद पवार यांनी घेतली सदिच्छा भेट...

डाॅ. अजय कांत यांची काँग्रेस नेते देवानंद पवार यांनी घेतली सदिच्छा भेट…

Share

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

कारंजा लाड – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेस चे प्रभारी देवांनद पवार यांनी शहरातील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त व मनमिळाऊ तसेच सुसंस्कृत शांत संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ख्याती असलेले डाॅ अजय कांत यांची वाढदिवसानिमित्त नुकतीच सदिच्छा भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी काँग्रेस नेते व यवतमाळ जिल्हा परिषद चे माजी आरोग्य सभापती असलेले देवानंद पवार यांनी डाॅ अजय कांत यांच्या कडुन शहरातील वैद्यकीय विषयक माहिती घेऊन भविष्यात आरोग्य क्षेत्रात कारंजा मानोरा भागात विशेष काही करता येईल काय यावर डाॅ अजय कांत यांच्याशी चर्चा केली.

यावेळी निवासस्थानी प्रथम आगमनानिमित्त डाॅ अजय कांत यांनी सुध्दा ‘ अतिथी देवो भव ‘ या संस्कृती नुसार काँग्रेस नेते देवानंद पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी देवानंद पवार यांच्या सोबत शहर काँग्रेस चे अध्यक्ष अमीर खान पठाण ,ॲड संदेश जैन जिंतुरकर व दवाखान्यातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: