Saturday, May 4, 2024
Homeराज्यमुख्याधिकारी विजय लोहकरे अकोला जिल्हा सह आयुक्तपदी रुजू...

मुख्याधिकारी विजय लोहकरे अकोला जिल्हा सह आयुक्तपदी रुजू…

Share

अकोला : वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांची अकोला येथील जिल्हा सह आयुक्त (जिल्हा प्रशासन अधिकारी, गट-अ, नगर पालिका प्रशासन विभाग) पदावर नियुक्ती केली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने पदस्थापना केली असून त्यांनी काल अकोला कार्यालयात या पदाची सूत्रे स्विकारली.

विजय लोहकरे हे नव्यानेच निर्माण करण्यात आलेल्या या पदावर रुजू होणारे पहिलेच अधिकारी असून यापूर्वी ते यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगर पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी मूर्तिजापूर, चांदूर रेल्वे, मोर्शी, वरुड, लोणार या ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

मूर्तिजापूर नगर पालिकेच्या मुख्याधिकारी पदी त्यांनी दोन टर्म काम केले असून कोरोना काळातील त्यांची कारकिर्द विशेष प्रभावी ठरली होती. मूर्तिजापुरातील त्यांच्या कार्यकाळात पीएम स्वनिधी योजनेंतर्गत पीएम अवॉर्ड करिता मूर्तिजापूर नगर पालिकेची निवड झाली होती व देशातून या अवॉर्डसाठी निवड झालेल्या ८ नगरपालिकांपैकी ही राज्यातील एकमेव नगरपालिका ठरली होती.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: