Thursday, November 30, 2023
Homeराज्यपार्कसाईट येथील अनाधिकृत भरणाऱ्या गुरूवारच्या बाजारात विरोधात भाजप महिला उग्र आंदोलन...

पार्कसाईट येथील अनाधिकृत भरणाऱ्या गुरूवारच्या बाजारात विरोधात भाजप महिला उग्र आंदोलन…

Spread the love

धीरज घोलप

पार्क साईट येथील आनंद गड नाका ते वर्षा नगर पाणी येथे प्रत्येक गुरुवारी अनाधिकृत फेरीवाल्यांचा मोठा बाजार महिलांसाठी जीव घेणे येथे ठरत असतो. फेरीवाल्यांमुळे या विभागात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. महिला बाजारात आल्यानंतर त्यांच्या पिशवीला खालच्या बाजूने ब्लेड मारणे हा प्रकार सर्वच घडत आहे. महिलांची छेडछाड होत असते.

हा रस्ता २५ ते ३० फुटाचा असल्यामुळे सर्व फेरीवाले ह्या रस्त्यावर बसतात त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते जर भविष्यात इथे आग लागली किंवा मोठी दुर्घटना घडली तर बचाव कार्यासाठी कुठेही जागा नाही. म्हणून पार्क साईट भाजप महिला मोर्चा वार्ड १२३ यांनी ३१ ऑगस्ट २०२३ रोजी या फेरीवाला विरोधात उग्र आंदोलन करण्याचे सांगितले आहे मात्र याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल असं पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे.


Spread the love
Dhiraj Gholap
Dhiraj Gholaphttp://mahavoicenews.com
मी पत्रकार धीरज घोलप, विक्रोळी-मुंबई येथे गेल्या १५ वर्षापासून पत्रकार या क्षेत्रात कार्यरत आहे. महाव्हॉइस या लोकप्रिय वाहिनी मध्ये गेल्या ५ वर्षापासून मुंबईसारख्या शहरांमध्ये सक्रिय पत्रकारीता करीत आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: