Friday, September 22, 2023
Homeराज्यभाजप महिलानी सफाई कर्मचारी सोबत रक्षाबंधन दिन साजरा केला...

भाजप महिलानी सफाई कर्मचारी सोबत रक्षाबंधन दिन साजरा केला…

सांगली – ज्योती मोरे

भाजप महिला मोर्चा पूर्व मंडळ मिरज अध्यक्ष रूपाली देसाई यांच्यावतीने आज रक्षाबंधनाचा दिन सफाई कर्मचाऱ्यांच्या सोबत राखी बांधून फळे व साबण देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

कोरोना काळ तसेच इतर साथीच्या काळात नेहमीच सफाई कर्मचारी कधीही कसले ही कारण न देता सर्व शहर स्वच्छ करून सर्वांच्या आरोग्याची रक्षा केली म्हणून आज भाजप पूर्व मंडल महिला मोर्चा मिरज च्या वतीने सर्व सफाई कर्मचाऱ्याना राखी बांधली फळे व डेटॉल साबण देऊन त्यांना ही स्वतःच्या सुरक्षेची व आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले यावेळी मंडल अध्यक्ष सौ. रुपाली देसाई, सरचिटणीस सौ. ज्योती कुलकर्णी, उपाध्यक्ष सौ सुचिता बर्वे, चिटणीस सौ. रश्मी जाधव व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: