Sunday, April 28, 2024
Homeराज्यबिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत नरुटे सेवानिवृत्त…

बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत नरुटे सेवानिवृत्त…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

नांदेड पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी व पाच पोलीस अंमलदार नियत वयोमानानुसार आज दिनांक 31ऑगस्ट 2023 रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यात बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत नरुटे यांचा समावेश आहे.

अपर पोलीस अधीक्षक आबीनाश कुमार यांच्या हस्ते बिलोलीचे पोलीस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या सह सर्व सेवानिवृत्तांचा पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ व भेट वस्तु देवुन सत्कार करण्यात आला. सदर सेवानिवृत्त समारंभ मंथन हॉल पोलीस अधिक्षक कार्यालय येथे पार पडला. सर्व सेवानिवृतांनी आता आपल्या कुटूंबाकडे पुरेसा वेळ देण्याचा सल्ला दिला.

या प्रसंगी पोलीस उप अधीक्षक श्रीमती डॉ. अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक पोलीस कल्याण नामदेव रिठ्ठे, मपोउपनि श्रीमती माया भोसले, पोलीस कल्याण विभाग नांदेड, व ईतर शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार मोठया संख्येने हजर होते. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन मपोकों रूकमीण कानगुले, मसका यांनी केले असुन, मपोकॉ राखी कसबे, पोलीस कल्याण, यांनी कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे आयोजन केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: