Monday, December 11, 2023
Homeगुन्हेगारीभाटव्याचा अल्पवयीन साळीवर लैंगिक अत्याचार, मोवाडमधील नात्याला काळीमा फासणारी घटना...

भाटव्याचा अल्पवयीन साळीवर लैंगिक अत्याचार, मोवाडमधील नात्याला काळीमा फासणारी घटना…

Spread the love

पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने सख्ख्या | विवाहित बहिणीने संबंधास भाग पाडले

नरखेड – पैशाचा पाऊस पडतो, असे सांगून अल्पवयीन सख्ख्या बहिणीला नवऱ्यासोबत, शारीरिक संबंध करायला, लावणाऱ्या पत्नीसह (मोठी बहिण ) तिच्या नवऱ्याविरोधात नरखेड, पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना मोवाडमध्ये समोर आल्यावर, परिसरात खळबळ उडाली असून, आता नात्यांवर विश्वास राहिला नसल्याचे चित्र आहे. आरोपी सतिश शेषराव बेले (वय ३८) व पूजा सतिश बेले (वय २५) अशी आरोपींची नावे आहेत.

सख्या मोठ्या बहिणीने आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन बहिणीला पैशाचा पाऊस पाडण्यासाठी नवऱ्यासोबत शारीरिक संबंध करायला भाग पाडले. आरोपी सतीश बेले याने साळीवर वारंवार लैगिक अत्याचार केला. टाळले असता शिवीगाळ व मारहाण संबंध प्रस्थापित करायचा तसेच पाहुन घेण्याची धमकी देऊन बळजबरीने अत्याचार करायचा असे फिर्यादी पीडितेने तोंडी तक्रारीत म्हटले आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी पती पत्नीविरूद्ध नरखेड पोलिस स्टेशनमध्ये शनिवारी विविध कलमान्वये नोंद करण्यात आला. पोलिस निरिक्षक जयपालसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक पल्लवी काकडे ( पोकसो पथक काटोल), महेश बोथले, दिलीप मसराम पुढील तपास करीत आहेत.


Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: