Saturday, April 27, 2024
Homeराज्यजुन्या वादावरून डोळ्यात चटणी टाकून मारहाण, शहरातील गांधीनगर परीसरातील घटना...

जुन्या वादावरून डोळ्यात चटणी टाकून मारहाण, शहरातील गांधीनगर परीसरातील घटना…

Share

मालेगाव ( वाशिम ) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव शहर प्रतिनिधी फिर्यादी हा क्रिकेट ग्राउंड वर क्रिकेट खेळत असताना जुन्या वादावरून अरबाज खान जावेद खान यांनी फिर्यादी दाऊद खान अख्तर खान पठाण वय 27 वर्ष रा पठाणपुरा मालेगाव याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून मारहाण करून जखमी केल्याची घटना.

दिनांक 1 मार्च रोजी गांधीनगर भागातील बोरगाव रोडवर असलेल्या क्रिकेट ग्राउंड वर सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली .याबाबतची फिर्याद जखमी दाऊद खान अख्तर खान पठाण वय 27 वर्ष रा .मालेगाव यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली.

यामध्ये नमूद केली की फिर्यादी हा सकाळी साडेसात वाजता क्रिकेट ग्राउंड वर क्रिकेट खेळत असताना यातील नमूद आरोपी अरबाज खान जावेद खान याने जुन्या वादाच्या कारणावरून हातातील चटणी फिर्यादीच्या डोळ्यावर फेकून फिर्यादीस मारहाण केली.

तसेच त्याच्या कमरेला असलेला खंजीर काढून मारायच्या उद्देशाने अंगावर धाऊन आला. यामध्ये फिर्यादी हा जखमी झाला अशा आशयाच्या फिर्यादीवरून व वैद्यकीय तपासणीच्या अहवालावरून आरोपी अरबाज खान जावेद खान यांच्याविरुद्ध मालेगाव पोलिसांनी कलम 324 506 भादंवी नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय रवी सैबेवार हे करीत आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: