Monday, May 13, 2024
Homeराज्यनांदेडकरानो सावधान..! वाहने पार्किंगमध्ये लावा: पोलिसांकडून टोइंग व्हॅनची कारवाई सुरु...

नांदेडकरानो सावधान..! वाहने पार्किंगमध्ये लावा: पोलिसांकडून टोइंग व्हॅनची कारवाई सुरु…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

शहरातील वाढत्या रहदारीमुळे व गाडी पार्किंग व्यवस्थित न लावत असल्यामुळे नागरिकांना अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होत असल्याने पोलिसांनी शहरात टोइंग व्हॅनची कारवाई सुरु केली असून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनावर व चालकावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरामध्ये सण उत्सव व वाढती रहदारीमुळे वारंवार होणारी रहदारीस अडथळा त्यामुळे नागरीकांचा नाहक त्रास टाळण्यासाठी व गर्दी कमी करण्यासाठी नागरीकांनी आपले वाहन थांबवते वेळी व पार्कीग करते वेळी रहदारीस अडथळा होणार नाही.व जनतेस त्रास होणार नाही अशा ठिकाणी आपले वाहन थांबवावे असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

जे वाहनचालक वाहनांच्या नियमांचे पालन न करता आपले वाहन अस्थावेस्त व रहदारीस अडथळा होईल अशा ठिकाणी लावतील तर नांदेड पोलीसांकडुन त्यांचे वाहण टोइंग करण्यासाठी टोइंग व्हॅनची सुरूवात करण्यात आली आहे. नियमाचे पालन करणार नाही त्या वाहनावर व चालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे.


Share
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: