Homeराज्यपरीट समाज सांगलीच्या वतीने मनपा शाळांमध्ये वहयांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत - महापौरांसह...

परीट समाज सांगलीच्या वतीने मनपा शाळांमध्ये वहयांच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना मदत – महापौरांसह नगरसेवक विष्णू मानेंची उपस्थिती…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली परीट समाज सांगली यांच्या वतीने आज सांगली शहरातील मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या आणि पेनच्या स्वरूपात मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.

आज मनपा शाळा नंबर 33 आणि 36 मधील विद्यार्थ्यांना महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि प्रभाग क्रमांक आठ चे नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रमुख उपस्थितीत वहयांच्या स्वरूपात मदत करण्यात आली.

यावेळी शाळा नंबर 36 च्या मुख्याध्यापिका प्रबोधिनी पतंगे, शंकर ढेरे, रेशमा कोकणे, शाहीन सनदी, कविता चौगुले,रोहिणी रेणके, तर शाळा नंबर 33 मधील मुख्याध्यापिका माळी मॅडम आणि वनखंडे सर आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे संयोजन परीट समाजाचे माजी प्रदेशाध्यक्ष कवी बन्सीलाल कदम आणि लॉन्ड्री असोसिएशनचे सचिव अभय शिंदे यांनी केले होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: