Sunday, April 28, 2024
Homeराज्यमहिलांच्या सुरक्षेसाठी देश भ्रमण करणाऱ्या आशा मालवीय हिचा - महामार्ग पोलिस केंद्राच्या...

महिलांच्या सुरक्षेसाठी देश भ्रमण करणाऱ्या आशा मालवीय हिचा – महामार्ग पोलिस केंद्राच्या वतीने सत्कार…

Share

कोल्हापूर – राजेंद्र ढाले

महिलांच्या सुरक्षिततेसाठी  व पर्यावरण संरक्षण साठी सायकलवरून देशभ्रमण करणाऱ्या आशा मालवीय (वय-२४) रा.नाटराम जि.राजगड (मध्यप्रदेश) या तरुणीचा उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या वतीने सपोनि चंद्रकांत शेडगे यांच्या हस्ते  सत्कार करण्यात आला. ही तरुणी २८ राज्यांमधून  २० हजार किलोमीटरचा सायकल वरून देशभ्रमण करणार आहे. 

  उच्च शिक्षण घेतलेली ही तरुणी  पदवयुत्तर पदवी आणि बीपीएड आहे.सायकलवरून भ्रमण करीत असून  महिलांच्या सुरक्षेसाठी ती भारताला जागवण्याचे काम आशा करीत आहे. तिने मध्य प्रदेशाच्या स्थापना दिनापासून २० हजार किलोमीटरचा प्रवास सुरू केला आहे. गुजरातमधून ती आतापर्यंत अडीच हजार  किलोमीटरचा प्रवास करत  कोल्हापूर मध्ये दाखल झाली. 
या कार्यक्रमात जागतिक एड्स दिनानिमित्त युवा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने एड्स जनजागृती करण्यात आली. यावेळी आशा मालवीय हिने एड्स जनजागृती कार्यक्रम महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.

यावेळी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कविता नाईक, पोलीस उपनिरीक्षक सुनील माळगे, ठाणे अंमलदार शंकर कोळी, ट्रॉफी क पोलीस कर्मचारी व युवा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते, प्रल्हाद कांबळे, आनंद सज्जन, शारदा गुरव, दिपाली सातपुते,विजय राजपाल, सुजाता राजपाल,सूरज पाटील आदी उपस्थित होते.

 मी  एकटी सायकल वरून ही यात्रा भारतभर करीत आहे.  महिलांनी येणाऱ्या प्रसंगांना धैर्याने तोंड दिले पाहिजे. तसेच तरुण- तरुणांनी छोट्याशा प्रश्नांना घाबरून न जाता आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नयेत. महिला संरक्षण, पर्यावरण,  हा माझा भारत भ्रमणचा विषय आहे. जवळजवळ अकरा साडेअकरा महिन्याच्या प्रवासात २५० ते ३०० दिवस   भ्रमण यात्रा असणार आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही सत्कार केला आहे.

आशा मालवीय – पर्वतरोही ,राष्ट्रीय खेळाडू 


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: