Homeराज्यनांदेडमध्ये शनिवारपर्यंत एकूण ३ अर्ज दाखल : ८४ अर्जांची कक्षातून उचल...

नांदेडमध्ये शनिवारपर्यंत एकूण ३ अर्ज दाखल : ८४ अर्जांची कक्षातून उचल…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत आज शनिवारी नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये दोन अर्ज दाखल करण्यात आले. गेल्या गुरुवारी एक व आज शानिवारी २ असे एकूण आतापर्यंत ३ अर्ज दाखल झाले आहेत.तर आतापर्यंत ८४ अर्जाची उचल झाली आहे.

आज नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे अकबर अख्तर खॉन यांनी अर्ज दाखल केला आहे. तर दुसरा अर्ज साहेबराव भिवा गजभारे या अपक्ष उमेदवाराचा आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी १६- नांदेड लोकसभा मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. यापूर्वी गुरुवारी अपक्ष उमेदवार जफर अली खाँ मेहमूद अली खाँ पठाण यांनी अर्ज दाखल केला आहे.

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभा निवडणूक होत आहे.२८ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. उद्यापासून पुढील पाच दिवस अर्ज दाखल करता येणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिलला होईल. अर्ज ८ एप्रिलपर्यंत मागे घेता येईल. तर नांदेड लोकसभा निवडणुकीत नेमके किती उमेदवार हे आठ तारखेला निश्चित होईल.

८५ अर्जाची इच्छूकांकडून उचल

नांदेड लोकसभा संघाची निवडणूक २६ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या सूचकाला नामनिर्देशनपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयातील उमेदवार सहाय्य कक्षात मोफत उपलब्ध आहेत. काल गुड फ्रायडे असल्यामुळे अर्ज घेण्यासाठी सुटी होती.आज तिसऱ्या दिवशी आणखी 34 कोरे फॉर्म उमेदवार व प्रतिनिधी घेऊन गेले आहेत. पहिल्या दिवशी 50 कोरे फॉर्म उमेदवार सहाय्यता कक्षातून इच्छूकांनी घेतले होते. त्यामुळे आतापर्यंतच्या उचल झालेल्या अर्जाची संख्या 84 झाली आहे.

५ एप्रिलला छाननी

नामनिर्देशनपत्राची छाननी शुक्रवार 5 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवार ८ एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेपर्यत देता येईल.

प्रवेशासाठी प्रतिबंधित क्षेत्र

उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या दिनांक पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांपासून तर उमेदवारी अर्ज दाखल करणे व अर्ज प्राप्त करण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना ओळख ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. अर्ज देण्याच्या प्रक्रिये काळात हे क्षेत्र अंशतः प्रतिबंधित करण्यात आले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापुढेच सहाय्यता कक्ष असल्यामुळे सकाळी ११ ते ३ या काळात अत्यावश्यक काम असल्याशिवाय या परिसरात परवानगी शिवाय प्रवेश बंदी आहे.


Share
Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: