Tuesday, May 7, 2024
Homeराज्यअवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष...

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करा, नमो नमो मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांचे निवेदन…

Share


रामटेक – राजू कापसे

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन शासनानी त्वरीत पंचनामे करुण मदत जाहिर करावी अश्या मागणीचे पत्र नमो नमो मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार यांनी नुकतेच उपविभागीय अधिकारी ( महसुल ) वंदना सवरंगपते यांना दिले.बुधवार दिनांक २९ नोव्हें. रोजी हे निवेदन उपविभागीय अधिकारी सौ. वंदना सौरंगपते मॅडम यांना देण्यात आले.

रामटेक विधानसभा क्षेत्रातील रामटेक,पारशिवनी व मौदा या तिन्ही तालुक्यात गेल्या काही दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या धान (भात) पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.त्यामुळे या निवेदनाद्वारे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची त्वरित पाहणी करून शासनातर्फे ५० हजार रुपये प्रति एकरी नुकसान भरपाई म्हणुन मदत देण्यात यावी,

शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे विद्युत बिल माफ करण्यात यावे, पेंच प्रकल्पातील पाणीपट्टी माफ करण्यात यावी तसेच पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी इत्यादी मागण्यांसह निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थितांमध्ये नमो नमो मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार, प्रशांत मसार, दिपक तिवाडे, अविनाश कामळे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष नमो नमो मोर्चा भा. नागपुर, नत्थु घरजाडे,गुणवंता मडगवार, कुणाल हटवार, शुभम सरियाम, अमबधरे, रुपेश बरडे आदी. उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: