Saturday, April 27, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | लाच घेतल्याप्रकरणी LCB च्या दोन पोलिसांना रंगेहात पकडले...अमरावती ACB ची...

अमरावती | लाच घेतल्याप्रकरणी LCB च्या दोन पोलिसांना रंगेहात पकडले…अमरावती ACB ची कारवाई…

Share

अमरावती – स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणच्या दोन पोलिसांना, 110 कलमांतर्गत होणारी कार्यवाही निकाली काढण्याकरिता संबंधितांकडून लाच स्वीकारताना अमरावती लाच प्रतिबंधक पथकाने रंगेहात अटक केली असून या प्रकरणातील आरोपी १) श्री. विशाल रामरावजी हरणे, पोलीस हवालदार, ब. न. 1918, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण
२) श्री. प्रशांत महादेवराव ढोके, पोलीस नाईक, ब. न. 1753, स्थानिक गुन्हें शाखा, अमरावती ग्रामीण असे नाव असून दोन्ही आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगे नगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची हकीकत अशी आहे की, ग्राम उंबरखेड, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती येथील 55 वर्षीय इसमाने अमरावती लाच प्रतिबंधक कार्यालयाकडे दिनांक 10 ऑगस्ट 2022 ला तक्रार दिली की, त्याच्यावर कलम 110 प्रमाणे प्रतिबंधक केस दाखल आहे. ही केस निकाली काढण्याकरिता त्याने स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीणचे पोलीस हवालदार विशाल रामराव हरणे तथा पोलीस नाईक प्रशांत महादेवराव ढोके यांना विनंती केली. हे काम करण्याच्या मोबदल्यात या दोघांनीही 1500 रुपयांची लाच मागितली.

नंतर लाच प्रतिबंधक अमरावती पथकाने पडताळणी केली. त्यात लोकसेवक विशाल हरणे व प्रशांत ढोके यांनी 1500 रुपयांची लाच मागणी केल्याचे आणि स्वीकारण्यास मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अमरावती लाच प्रतिबंधक पथकाने दिनांक 20 सप्टेंबर रोजी सापळा कार्यवाही केली. त्यावेळी पोलीस हवालदार विशाल रामराव हरणे ह्याने संबंधितास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कार्यालयात बोलाविले. तिथे एकूण लाच रकमेपैकी पाचशे रुपये लाच स्वीकारताना त्याला रंगेहात अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन गाडगे नगर अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही विशाल गायकवाड पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग अमरावती, अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत देवानंद घेवारे, उपअधीक्षक संजय महाजन यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल कडू, केतन मांजरे, पोलीस नायक विनोद गुंजाळ यांनी केली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: