Wednesday, May 1, 2024
Homeराज्यअमरावती | नकली सोन्याच्या गिन्या विकणारा अटकेत...स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही...

अमरावती | नकली सोन्याच्या गिन्या विकणारा अटकेत…स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही…

Share

अमरावती ग्रामिण जिल्हयातील पो.स्टे. लोणी हद्दीत दि. २३/०७/२२ रोजी फिर्यादी नामे संजय मगनलाल सोनकर, रा. जबलपूर यांनी तक्रार दिली होती की, आरोपी नामे शहादेव बाजीराव जाधव, वय ५२ वर्षे, महागांव मार्केट, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला याने त्याचे साथीदारासह संगणमत करून त्याचेकडे (आरोपीजवळ) सोन्याचे गिन्या असून त्या स्वस्त दरात विक्री करावयाच्या असल्याची खोटी बतावणी केली.

सदर गिन्यांबाबत व्यवहार निश्चित झाला व सदर व्यवहार हा पो.स्टे. लोणी हद्दीत ज फाटा येथे होणार होता. घटनेचे दिवशी फिर्यादी हे नगदी १,५०,०००/- रु घेवून नमूद्र स्थळी आले असता यातील वरनमुद आरोपी व त्याचे साथीदारांनी फिर्यादीस मारहाण करून त्यांचे जवळील नगदी व दोन मोबाईल असा एकुण १,६०,८००/- रूचा मुद्देमाल जबरीने हीसकावून मेला वरून पो.स्टे. लोणी येथे दरोडयाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

घटनेचे गांभीय पाहता घटनेतील आरोपी निष्पन्न करण्याबाबत मा. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक, अमरावती यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित केले होते.

घटनेचे दिवसा पासुन नमुद आरोपी हा फरार होता दि. १३/०७/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. लोणी हद्दीत पेट्रोलींग करित असतांना गोपनिय माहीती मिळाली की, आरोपी नामे शहादेव बाजीराव जाधव, वय ५२ वर्ष, महागांव मार्केट, ता. बार्शी टाकळी, जि. अकोला हा ग्राम पिंजर, जि. अकोला येथे बाजाराचा दिवस असल्याने बाजार करण्या करिता येणार आहे.

स्वा.गु.शा. चे पथकाने प्राप्त माहीतीची त्वरीत दखल घेत ग्राम पिंजर येथे सापळा रचुन नमुद आरोपीस मोठ्या शिताफीने अटक केली आहे. सदर आरोपीस पुढील कार्यवाही करिता पो.स्टे. लोणी यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास लोणी पोलीस करित आहेत. सदरची कारवाई मा. श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधिक्षक,

अमरावती ग्रा. मा. श्री. शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पोलीस निरिक्षक स्था.गु.शा., अमरावती प्रा. यांचे नेत्वृतातील श्री. तसलीम शेख, पो.उप.नि., श्री. मुलचंद भांबुरकर, पो.उप.नि., पोलीस अमलदार चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, मंगेश लकडे, सचिन मिश्रा, हर्षद घुसे यांचे पथकाने केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: