Thursday, May 2, 2024
HomeराजकीयAmravati Loksabha | अमरावतीत तिरंगी लढतीत कोण पुढे?...या उमेद्वारची भक्कम स्थिती...

Amravati Loksabha | अमरावतीत तिरंगी लढतीत कोण पुढे?…या उमेद्वारची भक्कम स्थिती…

Share

Amravati Loksabha – अमरावती लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा धुमधडाका सुरु असून सध्या या मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळणार असल्याचं राजकीय विश्लेषकांच म्हणणे आहे. महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. त्यामुळे त्यांची मतदार संघात मोठी चर्चा आहे.तर या लढतीत 37 उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत वानखडे, भाजपचे उमेदवार नवनीत राणा आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्यात होत आहे.

अमरावती मतदार संघ हा अकोल्यापेक्षा कितीतरी पटीने प्रगत आहे. या मतदार संघात जातीपातिला थारा नसून कामाच्या माणसाला या मतदार संघात निवडून आणतात मग तो कोणत्याही जातीचा असो. याउलट अकोला मतदार संघात जातीचा ,धर्माचा उमेदवार पाहिजे तरच लोक मतदान करतात. सध्याच्या या तिरंगी लढतीत भाजपचे उमेदवार नवनीत राणा याचं कट्टर हिंदू कार्ड चालत नसून मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिष्माई लाटेने विजयाची खात्री आहे, परंतु 2014 मध्ये मोदीची लाट होती तशी लाट यावेळेस या मतदार संघात बघायला मिळत नाही. तर हा मतदार संघ अगोदर शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने नवनीत राणा यांना शिवसेनेची मत मिळणार कि नाही याची शाश्वती देता येणार नाही सोबतच भाजपच्या दोन तीन गटात नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्याने नाराजी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे भाजपचा एक गट बळवंत वानखडे यांच्या बाजूने जाणार असल्याचे राजकीय तज्ञाचे म्हणणे आहे तर दुसरा गट बच्चू कडू यांच्या उमेदवाराला दिनेश बुब यांच्याकडे जाणार आहे. सोबतच दिनेश बूब यांच्याकडे हिंदी भाषिक व शिवसेनेचे काही मते त्यांच्या पारड्यात पडणार आहे. दिनेश बुब यांची शहरात समाजसेवक अशी स्वतःची ओळख असून प्रहारच्या जादूतून विजयाची आशा आहे.

या निवडणुकीच्या रणधुमाळीचे विश्लेषण केले तर काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांची स्थिती जमिनीच्या पातळीवर भक्कम दिसते. याचे कारण स्पष्ट आहे. या निवडणुकीत वानखडे यांची मते कापू शकेल असा एकही दलित तगडा उमेदवार नाही. प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर असल्याने त्यांना 50 हजारांहून अधिक मते भेटली तर बळवंत वानखडे याचं कमी जास्त होऊ शकते. नवनीत राणा यांना या व्होट बँकेचा फारसा फायदा होण्याची फारशी आशा दिसत नाही कारण या व्होट बँकेवर प्रभाव टाकू शकणारे उमेदवार बळवंत वानखडे रिंगणात आहेत.

या वेळी मुस्लिम मतदार नवनीत राणा यांच्यासाठी या निवडणुकीत दिसत नाहीत.
गेल्या निवडणुकीत श्रीमती राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. या निवडणुकीच्या रिंगणात रिपाइंचे हिंमतराव ढोले हे उमेदवार असून, त्यांच्याकडून मतं कापण्याची अपेक्षा सोप्या शब्दात सांगितल्यास निरर्थक ठरेल. या मेगा निवडणुकीच्या रणधुमाळीत अमरावती जिल्ह्यात 18 लाखांहून अधिक मतदार आहेत. दरवर्षी मतदानाबाबत जनजागृती करूनही ६०/६५ टक्क्यांहून अधिक मतदान होत नाही. यावेळी एप्रिलच्या उन्हाचाही परिणाम मतदानावर होऊ शकतो. नवनीत राणा यांना मेळघाटातून चांगल्या निकालाची अपेक्षा आहे.

गेल्या निवडणुकीत या आदिवासीबहुल भागातून राणा यांना चांगलीच पसंती मिळाली होती, मात्र यावेळी निवडणुकीपूर्वी होळी, दिवाळीचा कार्यक्रम नव्हे, तर विकासाचा आवाज मेळघाटातून येतो का, हे पाहणे बाकी आहे नवनीत राणा यांचा करिष्मा यावेळी मेळघाटात कामी येईल की नाही हे येणारा काळच सांगेल पण आदिवासी मतदार पंजा हे निवडणूक चिन्ह ओळखतात त्यामुळे वानखडे यांनाही मेळघाटातून चांगलाच मतदानाचा कल मिळू शकतो. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल प्रहारमधून दिनेश बुब यांना किती मते मिळवून देतील हे सांगणे घाईचे असले तरी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या 2रा अचलपूर निवडणुकीतून दिनेश बुबांना चांगलाच कल मिळू शकतो. अचलपूर मतदारसंघ हा काँग्रेस आणि सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, भाजपचीही येथे मजबूत व्होट बँक आहे, त्यामुळे बळवंत वानखडे यांची स्थिती चांगली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: