Tuesday, April 30, 2024
HomeBreaking NewsAmravati Loksabha | अडसूळ आणि राणा यांच्यात दिलजमाई...सकाळीच केली होती टीका...

Amravati Loksabha | अडसूळ आणि राणा यांच्यात दिलजमाई…सकाळीच केली होती टीका…

Share

Amravati Loksabha : अमरावतीच्या राजकारणात एक मोठा ट्विस्ट आला आहे. एकमेकांचे शत्रू असलेले अचानक आज मित्र झाल्याच्या बातमीने अनेकांना विस्वास बसत नाही होय, हे खर आहे. अमरावती मतदार संघाचे विद्यमान खासदार नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसुळ यांचे सुपुत्र अभिजित अडसूळ यांच्यात दिलजमाई झाल्याने अमरावतीच्या शिवसैनिकांची झोपच उडवून दिली आहे. आज सकाळी च बुलढाण्यात आनंदराव अडसूळ यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर जहरी टीका केली होती. त्यानंतर थोड्याच वेळात काय चक्रे फिरली कुणास ठाऊक, पण त्याचा परिणाम लागलीच दिसून आला. नवनीत राणा आणि रवी राणा हे थेट अभिजीत अडसूळ यांच्या भेटीला गेले. त्यावरुन आता दोघांमध्ये दिलजमाई झाल्याचे दिसून येत आहे.

आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले. खरंच त्या पती पत्नीला अक्कल आहे की नाही, माझा प्रश्न आहे.नैतिकता नाही, अक्कल नाही.. आटापिटा करून मंडळींनी मला थांबविले आणि तिला उमेदवारी दिली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. गेल्यावेळी नवनीत राणा या राष्ट्रवादी , काँग्रेस सोबत होत्या. त्यांनी तिथेच थांबायचे होते.त्यांच्यात अडाणीपणा आहे. 17 रुपयांच्या साड्या वाटून त्यांची हवा निर्माण झाल्याचा टोला त्यांनी लगावला होता.

अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या उमेदवारीवरुन महायुतीतील काही नेते नाराज होते. प्रहारचे बच्चू कडू यांनी या मतदारसंघात त्यांच्या पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे. तर अडसूळ पित्रा-पुत्रांनी पण तलवार बाहेर काढली होती. अभिजीत अडसूळ यांनी तर उमेदवारी अर्ज पण खरेदी केला होता. त्यामुळे राणा यांचा निवडणुकीचा मार्ग खडतर मानल्या जात होता. या भेटीनंतर अभिजीत अडसूळ बंड करण्याची शक्यता आता मावळली आहे.

आता आनंदराव अडसूळ प्रचाराला जाणार का?

आनंदराव आडसूळ यांनी अगोदर बुलडाणा मतदारसंघ नंतर अमरावती मतदारसंघातून शिवसेनेचा गड राखला होता. त्यानंतर नवनीत राणा यांची अमरावती मतदारसंघात एंट्री झाली. आता महायुतीत नवनीत राणा या भाजपच्या तिकीटावर लढत आहेत. त्यामुळे नाराज झालेल्या आनंदराव अडसूळ यांनी एकवेळ राजकारण सोडेल पण राणा यांच्या प्रचाराला जाणार नसल्याची भूमिका जाहीर केली आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: