Saturday, April 27, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | सोन्याचे दागिने जबरीने हिसकावणाऱ्या चोरट्यास फ्रेजरपुरा पोलिसांनी केले जेरबंद...

अमरावती | सोन्याचे दागिने जबरीने हिसकावणाऱ्या चोरट्यास फ्रेजरपुरा पोलिसांनी केले जेरबंद…

Share

दिनांक 15/04/2023 रोजी पो स्टे फेजरपुरा अमरावती शहर येथे फिर्यादी नामे विना भगवान गायकवाड वय 50 वर्ष रा उत्तमनगर गल्ली नं.01 अमरावती यांनी पो.स्टे. ला हजर येवून जबानी रिपोर्ट दिला होता की त्यांना याची आवश्यकता असल्याने त्यांचे जवळील जुने वापरते सोन्याचे दागदागीने एका हिरव्या पिशवी मध्ये ठेवुन सराफा दुकान मोतीनगर परिसरात गहाण ठेवण्याकरीता गेल्या परंतु दुकान बंद असल्याने ते परत त्यांच्या राहते घरी पायदळ येत असतांना यशोदानगर चौक अमरावती येथे एका अज्ञात दुचाकी स्वाराने त्यांना थांबवून त्यांचे सोबत बोलणी करून त्याचा परिचय पापड व्यवसायी असल्याचे सांगुन त्यांना पापड लाटण्याचे काम करीता 8000 रूपये महिना देण्याची बतावणी करून त्यांना घरी घेवुन जाण्याचे सांगुन आपले मोटर सायकल वर बसवुन घेवून कलोतीनगर अमरावती येथे निर्जन स्थळी नेवून जबरीने त्यांचे हातातील दागीने असलेली पिशवी हिसकावुन घेवुन तेथुन पळुन गेला.

अश्या फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून अप क. 279 / 2023 कलम 392 भा. दं. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासावर आहे. पो.स्टे. राजापेठ पोलीसांनी त्यांचे कडे तपासावर असलेला जबरी चोरीचे गुन्हयात आरोपी नामे मनिष अनिल जोशी वय 30 वर्ष रा. पार्वती नगर नं. 03 अमरावती यास अटक करून त्याने कबुली दिल्यावरून सदर गुन्हयातील चोरीस गेलेले 7.50 ग्रॅम सोने जप्त केले होते. दिनांक 19/08/2023 रोजी प्रोडक्शन वारंट व्दारे आरोपी नामे मनिष अनिल जोशी वय 30 वर्ष रा. पार्वती नगर नं.00 अमरावती यास ताब्यात घेवुन त्याचे कडुन त्याने सागितल्या प्रमाणे सराफा बाजार अमरावती येथुन सदर गुन्हयात जबरीने चोरी केलेला एकुण 7.50 ग्रॅम सोने जप्त करून असा एकुण 1250 ग्रॅम सोने कि.अं.51,000 रू. चा जप्त करण्यात आला आहे.

सदर कार्यवाही मा. नवीनचंद्र रेडडी सा. पोलीस आयुक्त अमरावती शहर, मा. सागर पाटील सा. पोलीस उपायुक्त सा परिमंडळ -01. अमरावती शहर व मा. प्रशांत राजे सा.स.पो.आ. फेजरपुरा विभाग अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. गोरखनाथ जाधव तपास अधिकारी पोउपनि आकाश वाठोरे, जि.बी. पथक प्रमुख जमादार योगेश श्रीवास, ना. पो. कॉ. सुहास शेंडे, श्रीकांत खडसे, हरीश चौधरी, हरीश बूंदेले पो. कॉ. धनराज ठाकूर यांचे पथकाने केली आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: