Sunday, April 28, 2024
HomeMarathi News Todayअमरावती | दिर भावजयच्या अनैतिक संबंधाच्या मधात येणाऱ्या २ वर्षाच्या मुलाला दिराने...

अमरावती | दिर भावजयच्या अनैतिक संबंधाच्या मधात येणाऱ्या २ वर्षाच्या मुलाला दिराने संपवलं…आरोपी अटक…

Share

अमरावती : शहराच्या फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या पिंपळखुटा येथील विलास कोठे हत्याकांडाचा उलगडा होत नाही तर दुसरे धक्कादायक प्रकरण समोर आलंय. येथे वहिनी आणि दिराच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. दीर आणि भावजयच्या अनैतिक संबंधाच्या मधात आडकाठी येणाऱ्या २ वर्षीय पुतण्याचा काकाने जीव घेतला. याप्रकरणी आरोपी काकाला फ्रेजरपुरा पोलीसांनी अटक केली आहे

हे प्रकरण अमरावती शहरातील फजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील पोहराबंदी भागातील आहे. आरोपी दिपक भोसले आणि त्याच्या भावजय पूजा मध्ये संबंध होते, या दोघांच्या संबधाची भावाला सुध्दा जान होती, त्याची वहिनी पूजा आरोपी दीपक नेहमी त्याच्या बहिणीसोबत राहत असे. पूजाला दोन वर्षाचा मुलगा होता तर आरोपी पूजा ला म्हणायचा हा मुलगा आपल्या मध्ये ठेवू नको याला भावाला परत देवून टाक. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडणे व्हायची पण आईचं मन मुलाला सोडायचे नव्हते. तिने काही वेळ मारून नेली मात्र तिच्या पोटच्या गोळ्याचा जीव घेईल अशी कल्पना नव्हती, याआधीही याच मुद्द्यावरून दिपकने पूजाला मुलांसह मारहाण केली होती, ज्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली होती.

५ सप्टेंबर रोजी सायंकाळी दीपक मजुरी करून थकून घरी आला त्यावेळी 2 वर्षाचा स्वामी पाळणाजवळ रडत होता, त्याच्याकडे त्याची आई त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. दिपकला त्याचे रडणे असह्य झाले त्याने मागचा पुढचा विचार न करता पाळणावरुन ढकलून दिले. त्याला कायमचे शांत करण्यासाठी त्याला लाथेने मारहाण केली याच्यात त्या चिमुरड्याचा जीव गेला….

असे नाही की त्याच्या भावाला या दोघांच्या नात्याची कल्पना नव्हती, परंतु या दोघांमधील हे लहान मूल मोठे होत होते म्हणून दीपकने पूजाला तीच्या नवऱ्याला मुलगा परत करण्यास सांगितले पण तिने शक्य न झाल्याने अखेर त्याने हे कृत्य केले. याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलीसांनी आरोपी दीपक भोसलेला अटक केली. या प्रकरणाचा एसएचओ गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: