Monday, May 6, 2024
Homeराज्यअमरावती | ST महामंडळाची भंगार बस ४० फुट दरीत कोसळली...बसमध्ये होते ४०...

अमरावती | ST महामंडळाची भंगार बस ४० फुट दरीत कोसळली…बसमध्ये होते ४० प्रवासी…

Share

अमरावती : राज्यात सध्या ST महामंडळाच्या भंगार बसेस रस्त्याने धावताना दिसतात बस पाहूनच आतमध्ये बसून प्रवास करण्याची हिम्मत होत नाही, मात्र दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने नाईलाज प्रवास करवा लागतो. अश्याच एका भंगार झालेल्या बस मेळघाटातील घटांग येथे बस ४० फूट दरीत कोसळली आहे. सुदैवाने यात जीवित हानी झाली नसून फक्त २ प्रवासी जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार २ प्रवासी यात जखमी झाले आहे. त्यांना तातडीने सिमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. घटाग येथील घाटात असलेल्या आडवळणावर हा अपघात झाला आहे. खंडवा कडून अमरावती कडे ही बस येत होती दरम्यान ब्रेक पाईप फुटल्याने हा अपघात झाला आहे.

या बसमध्ये ४० ते ५० प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. ST महामंडळाच्या भंगार बसेस मेळघाटच्या घाटातून चालत असल्याने नागरिकांनी नवीन आणि चांगल्या बसेस मेळघाटात द्याव्यात अशी मागणी केली आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: