Wednesday, May 1, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | दंगलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ अमरावतीच्या नावाने व्हायरल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल...

अमरावती | दंगलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ अमरावतीच्या नावाने व्हायरल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल…

Share

अमरावती | अकोलाच्या दंगलीनंतर संपूर्ण राज्य अलर्ट मोडवर असून अमरावती पोलीसही यावर घटनेनंतर सतर्क झाले आहेत. समाज माध्यमावर पोलीसांच विशेष लक्ष असून, दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्याने आज दोघांविरुद्ध गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनी 26 सेकंदांचा आक्षेपार्ह व्हिडिओ अमरावतीच्या नावाने व्हायरल केला होता व्हायरल.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री 11 वाजता यातील फिर्यादी ला मिळालेल्या गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरुन पोस्टॉप सह नमुद दोन्ही आरोपीतांना संपर्क केला असता आरोपी क्र १ मधुकर उमेकर, रा. राधानगर यांचे मोबाईलची पाहणी केली असता त्यांचे मोबाईलचे व्हाटसएप वरिल आपले गाव वनापसी ग्रुप वर पोस्ट टाकली की गांधी चोक मे ५०० ते १००० एका विशिष्ट समुदायाचे युवक वाहने अडवून नारे देत असल्याचे लिहण्यात आले. त्यामुळे संपूर्ण शहरात दंग्याची सदृश परिस्थिती निर्माण झाली असती.

अशी पोस्ट टाकुन २६ सेकंद चा व्हीडीओ पोस्ट केला. पोलिसांची बरिगेट ने त्यांना अडविले त्या इसमाच्या हातामध्ये कॉंग्रेस पक्षाचा तिरंगा झेंडा त्यावर पंजा अशा प्रकारचा झेंडा असुन जिंदाबाद जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद व नारे लावत आहे. तसेच पोलिस कन्नड भाषेत समजाविण्याचा प्रयत्न करितांना दिसत आहे. सदरची पोस्ट आरोपी क्र १ यांनी केलेली आहे.

त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की सदरची पोस्ट आरोपी क्र.2 गोपाल बर्फिलाल गुप्ता यांनी आ क्र १ ला केली आहे. सदर पोस्ट व्हाटसएप वर अपलोड करुन आरोपी क्र १ व २ यांनी दोन समाजामध्ये जातीय तेड निर्माण करुन सामाजीक शांतता भंग होवुन उददेशाने सदरची पोस्ट वायरल केली यामुळे अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे व सदरचा व्हिडिओ हा अमरावतीचा नसुन त्यांनी खोटी अफवाह पसरविली व त्यामुळे अमरावती शहरामध्ये दंगली होऊ शकतात यांची जाणीव असतांना सुदधा सदरचा मॅसेज वायरल केला. अश्या फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा दाखल केला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: