Monday, December 11, 2023
HomeMarathi News Todayअमरावती | २१ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध पाजून सतत तीन दिवस अत्याचार...पोलिसात...

अमरावती | २१ वर्षीय तरुणीला गुंगीचे औषध पाजून सतत तीन दिवस अत्याचार…पोलिसात गुन्हा दाखल…

Spread the love

सोशल मिडियावर एकाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारणे किती महागात पडू शकते. शिक्षणासाठी अमरावती शहरात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीची सोशल मीडियावर एका तरुणासोबत ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात संभाषण सुरू झाले. आठ दिवसांपूर्वी तरुणाने तरुणीला नागपुरात बोलावले. त्यावेळी दारूत गुंगीचे औषध देवून तीन दिवस सतत तरुणीवर अत्याचार केला. इतकेच नाही तर तरुणीचा अश्लील व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी तिला दिली, अशी तक्रार पीडित तरुणीने बुधवारी (दि. २७) गाडगेनगर ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अर्जून कांबळे ऊर्फ शिवा कदम ऊर्फ सदाशिव कदम असे एकाच व्यक्तीचे तीन नाव असलेल्या विरुद्ध पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. शहरात शिक्षणासाठी राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘फौजी १’ नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. तरुणीने ती स्वीकारली. त्यानंतर मोबाइल क्रमांकांची देवाण घेवाण झाली व त्यांच्यात संभाषण, चॅटींग सुरू झाले. दरम्यान, २२ जुलै २०२२ ला अर्जून ऊर्फ शिवा ऊर्फ सदाशिव याने तरुणीला नागपुरात बोलावले. तरुणी शहरातून नागपुरात गेली. त्यावेळी त्याने तरुणीला दारु पाजली. याचवेळी दारूमध्ये गुंगीचे औषध टाकले.

त्यानंतर नागपुरातील एका हॉटेलमधील रुम नंबर २०६ वर नेले. त्या ठिकाणी तीन दिवस ठेवले. हे तीन दिवस त्याने आपल्यावर इच्छेविरुद्ध जबरीने सतत बलात्कार केला तसेच याच दरम्यान अश्लील व्हिडिओसुद्धा तयार केल्याचा आरोप पीडित तरुणीने पोलिस तक्रारीत केला आहे. याचवेळी त्याने तरुणीला धमकी दिली की, या बाबत कुठेही वाच्यता केली तर हा अश्लील व्हिडिओ व्हायरल करणार आहे. या बाबत तरुणीने तक्रार दिल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी तीन नावे असलेल्या या आरोपाविरुद्ध बलात्कार करणे, धमकी देणे, गुंगीचे औषध देणे व इतरही कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.


Spread the love
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: