Monday, May 6, 2024
Homeराजकीयआकोट | सहकार गटाचा दणदणीत विजय…२१ पैकी २० जागांवर कब्जा…१ जागा गमाविल्याने...

आकोट | सहकार गटाचा दणदणीत विजय…२१ पैकी २० जागांवर कब्जा…१ जागा गमाविल्याने जल्लोष नाही…शेतकरी गट आत्मचिंतन करणार…

Share

आकोट- संजय आठवले

तब्बल १८ वर्षे बंद अवस्थेत असलेल्या आकोट जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहकार गटाला घवघवीत यश मिळाले असून त्यामध्ये संस्थेच्या २१ पैकी २० संचालक पदे या गटाच्या वाट्याला आली आहेत. तर सहकार गटाला कडवे आव्हान निर्माण करणाऱ्या शेतकरी गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. परंतु या निवडणुकीत प्रथमच उतरून चांगली मते प्राप्त झाल्याने मनोबल उंचावलेला शेतकरी गट या पराभवाची कारणमीमांसा करून पुढील वाटचाल करणार असल्याची माहिती आहे.

आजवरचा अनुभव पाहू जाता विरोधकांशी तडजोडीद्वारे त्यांचे काही उमेदवार घेऊन सहकार गटाने आकोट जिनिंग अँड प्रेसिंग संस्थेवर आपली पकड कायम ठेवलेली आहे. मात्र ही संस्था तब्बल १८ वर्षे बंद अवस्थेत ठेवल्याचा मुद्दा समोर करून शेतकरी गटाने यावेळच्या निवडणुकीत सहकार गटाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला. त्याने ह्यावेळी दोन्ही गटाकडून अत्यंत चुरशीने ही निवडणूक लढवली गेली. त्याकरिता अगदी शय्येवर खिळलेल्या मतदारांनाही मताधिकार बजाविण्याकरिता आणले गेले. अल्पकाळातच लागणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रंगीत तालीम या निवडणुकीचे निमित्ताने दोन्हीकडून घेतली गेली. अशा स्थितीत मतदानाची वाढती आकडेवारी पाहून सहकार गटात काहीसे चिंतेचे वातावरण जाणवत होते. तर दुसरीकडे शेतकरी गटात बऱ्यापैकी यश मिळण्याची अपेक्षा व्यक्त केल्या जात होती.

अशा अशा धाकधूकीत रात्री ७.०० वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. एक एक निकाल बाहेर येऊ लागला. तसतसे विजय पराभवाचे चित्र स्पष्ट होऊ लागले. आणि अखेर सहकार गटाच्या वाट्याला २१ पैकी २० तर शेतकरी गटाला केवळ १ जागा मिळाल्याचे घोषित करण्यात आले. त्याने शेतकरी गटात नैराश्य पसरले. तर दुसरीकडे आपली १ जागा गमावल्याची खंत जिव्हारी लागलेल्या सहकार गटाने विजयाचा जल्लोष न करण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत वैयक्तिक मतदारसंघातील एकूण १८०० मतदारांपैकी ११७३ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यात १०८६ मते वैध तर ८७ मते बाद झाली. सहकारी संस्था मतदारसंघात एकूण ४४ मतदारांपैकी ४३ मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यातील १ मत बाद ठरले. महिला राखीव मतदार संघात ३१ मते, इतर मागासवर्ग मतदार संघात २७ मते तर अनुसूचित जाती मतदार संघात २६ मते बाद ठरली.

वैयक्तिक मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ६४७ मते राजेश नागमते यांनी तर दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे ६१८ मते निलेश उर्फ बिट्टू पाचडे यांनी प्राप्त करून ६०० चा आकडा पार करण्याचा बहुमान प्राप्त केला. तर सहकारी संस्था मतदारसंघ वगळता अन्य सर्व मतदारसंघातील सहकार गटाच्या पाचही उमेदवारांनी ६०० चा आकडा पार केला. सहकारी संस्था मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३२ मते सहकार गटाचे सुभाष वानखडे यांना तर त्यांचे पाठोपाठ ३१, ३१ मते ललित बहाळे व मनोज बोंद्रे यांना मिळाली. तशीच २६,२६ अशी सारखी मते वामनराव बाणेरकर व भाऊराव काळंके यांना मिळालीत. हे सारे उमेदवार विजयी घोषित केले गेले.

या मतमोजणीत विजयी व पराभूत उमेदवारांना मिळालेली मते येणेप्रमाणे—
वैयक्तिक मतदार संघ विजयी उमेदवार— राजेश नागमते ६४७, निलेश उर्फ बिट्टू पाचडे ६१८, नंदकुमार थारकर ५९५, रामदास थारकर ५९४, गजानन पुंडकर ५७२, देविदास कराळे ५६२, राजेश पुंडकर ५६२, मनोहरराव गये ५६१ आणि अभिजीत अग्रवाल ५४६. पराभूत उमेदवार— निलेश हांडे ५४१, रवींद्र अरबट ५०४, संजय मानकर ४७९, अतुल सोनखासकर ४७३, शंकर डिक्कर ४५४, सतीश हाडोळे ४५१, मनोहर गाढे ४४०, गणेश इंगळे ४१९, राजकुमार खंडेराय ४०८.

सहकारी संस्था मतदारसंघ विजयी उमेदवार— सुभाष वानखडे ३२, ललित बहाळे ३१, मनोज बोंद्रे ३१, ताहेरउल्लाखाॅं पटेल २९, रुपराव म्हैसणे २८, वामनराव बानेरकर २६ आणि भाऊराव काळंके २६. पराभूत उमेदवार—अनंत गावंडे १९, ज्ञानेश्वर ढोले १७, सौ. भारतीताई वडाळ १४, संजय रेळे १२, डॉ. सुरेश रावणकर १२. महिला राखीव मतदार संघ विजयी उमेदवार– सौ. रमाताई गावंडे ६२०, सौ. मंगला पांडे ६२०, पराभूत उमेदवार— सौ. पल्लवी कोकाटे ५३३, श्रीमती सुरेखा लबडे ५१७. इतर मागासवर्गीय मतदार संघ विजयी उमेदवार—पुरुषोत्तम मुरकुटे ६१५, पराभूत उमेदवार– प्रदीप उर्फ बबलू कडू ५७३. भटक्या विमुक्त जाती मतदार संघ विजयी उमेदवार– कैलास कवटकार ६०८, पराभूत उमेदवार— काशीराम साबळे ५७८. अनुसूचित जाती मतदारसंघ विजयी उमेदवार– गजानन डांगे ६४५, पराभूत उमेदवार— संदीप आग्रे ५४४.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: