Tuesday, April 30, 2024
HomeMarathi News Todayअकोला | उद्या रेल येथे महादेव आणि माता पार्वती यांचा लग्न सोहळा...सोहळ्याला...

अकोला | उद्या रेल येथे महादेव आणि माता पार्वती यांचा लग्न सोहळा…सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन…

Share

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात रेल येथे आगळा वेगळा लग्न सोहळा दरवर्षी आयोजित केल्या जाते. तो सोहळा म्हणजे महादेव आणि माता पार्वती यांचा या सोहळ्याला पंचक्रोशोतील आदिवशी समाज एकत्र येवून मोठ्या उत्सहात हा सोहळा पार पाडल्या जातो. आपल्या सामान्य लग्नाप्रमाणेच सर्व विधी करून शेवट आलेल्या पाहुण्यांना संस्थान कडून जेवणाची व्यवस्था केली जाते.

सालाबाद प्रमाणे यंदाही वऱ्हाड प्रांता मधील आदिवासी कोळी महादेव बांधवांचे आराध्य दैवत देवाधिदेव महादेव व हिमकण्या आदिशक्ती माता पार्वती यांचा लग्न सोहळा आदिवासी पारंपारिक, चालीरीती नुसार अत्यंत उत्साहात व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थिती मध्ये दि. १६/०४/२०२४ मंगळवारी श्री. रेलेश्वर महादेव संस्थान रेल ता.अकोट जी.अकोला या ठिकाणी संपन्न होत आहे तरी सर्व भक्तांनी या नयनरम्य सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन श्री.सुधाकरराव घुगरे अध्यक्ष, श्री.रेलेश्र्वर महादेव संस्थान रेल यांनी केले आहे.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: